शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

आयुर्वेद डॉक्टरांना कायद्याचे संरक्षण

By admin | Updated: June 27, 2014 00:20 IST

आयुर्वेद डॉक्टरांना कायद्याचे संरक्षण

 

नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला आयुर्वेद डॉक्टरांचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून, आयुर्वेद डॉक्टांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्यास आता कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करून दोन्ही सभागृहांनी त्यास मंजुरी दिल्यामुळे आयुर्वेद डॉक्टरांना कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. दोन वर्षांपासून कॉँग्रेस नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या अस्तित्व परिषदेच्या माध्यमातून डॉक्टरांचा संघर्ष सुरू होता. आयुर्वेद डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याची परवानगी नाकारण्यात आल्यानंतर गेल्या २५ वर्षांपासून यासाठी आयुर्वेद डॉक्टर्स संघर्ष करीत होते. आयुर्वेदाच्या एम. एस. डॉक्टरांनादेखील शस्त्रक्रियेच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी वेळोवेळी कायद्याचा धाक दाखविण्यात आल्यामुळे सेवेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या डॉक्टरांमध्ये काहीशी असुरक्षिततेची भावना होती. आयुर्वेद विरुद्ध अ‍ॅलोपॅथी असा संघर्ष आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आयुर्वेद डॉक्टर्स संघटित झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आयुर्वेद डॉक्टरांची परिषद, मेळावे आणि मोर्चे झाल्याने राज्य शासनावर दबाव वाढला होता. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आयुर्वेद डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण विषय मांडल्यानंतर त्यास दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यामुळे आता आयुर्वेद डॉक्टरांना कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे सुमारे ८० हजार पदवीधर डॉक्टर्स आणि १० हजार पदव्युत्तर डॉक्टर्सना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याची संधी मिळणार आहे. या सर्व प्रकरणात अस्तित्व परिषदेचे प्रणेते नारायण राणे यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली. आता आयुर्वेद पदव्युत्तर डॉक्टरांना स्त्रीरोग, प्रसूती, जनरल सर्जरी, मेडिसिन, बालरोग, मानसरोग आदि क्षेत्रांत प्रभावीपणे कामकाज करता येणार आहे. त्यामुळे खेडोपाडी, ग्रामीण भागात आयुर्वेद डॉक्टरांच्या सेवेला कायद्याचा आधार मिळणार असून, रुग्णसेवादेखील घडणार आहे. अस्तित्व परिषदेचे डॉ. संदीप कोतवाल, मंदार रानडे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. ज्ञानेश्वर थोरात, डॉ. उल्हास कुटे, डॉ. आग्रे, डॉ. अरगडे, डॉ. पाटील, डॉ. परचुरे यांचे योगदान मोलाचे ठरले. (प्रतिनिधी)