शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘निरी’ने उपसले ‘माहिती’चे हत्यार

By admin | Updated: April 21, 2016 00:44 IST

पालिकेकडून दमछाक : फायटोरीड प्रकल्पाबाबत माहितीस टाळाटाळ

नाशिक : सर्वसामान्य नागरिकाला महापालिकेकडून माहिती अधिकाराच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची माहिती मिळविण्यात किती यातना सहन कराव्या लागतात, याबाबतचे असंख्य अनुभव असतील; परंतु ‘निरी’सारख्या सरकारी संस्थेलाही जेव्हा एखादी माहिती प्राप्त करण्यासाठी माहिती अधिकाराचे हत्यार उपसावे लागणे महापालिकेच्या एकूणच भोंगळ कारभाराचे दर्शन घडविते. गंगापूर गावात फायटोरीड प्रकल्पाबाबत मनपाने काय कार्यवाही केली याबाबतची माहिती मिळविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून ‘निरी’ला झुंझावे लागत आहे. परंतु अद्याप महापालिकेने माहिती देण्याची तसदी घेतलेली नाही. गोदावरी नदीची पूररेषा आणि प्रदूषणासंबंधी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान अर्थात ‘निरी’ या सरकारी संस्थेने आपला अहवाल दिलेला आहे. त्यात अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. निरीच्या अहवालासंबंधी अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीही नेमली होती. सदर उपसमितीचा अहवालही विभागीय आयुक्तांना सादर झालेला आहे. दरम्यान, निरीचा अहवाल गेल्या महासभेत प्रशासनामार्फत अवलोकनार्थ ठेवण्यात आला होता. परंतु सदर अहवाल इंग्रजीत असल्याने तो मराठीत सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. आता विभागीय आयुक्तांना एक पत्र पाठवून निरीने आपली व्यथा मांडली आहे. त्यात प्रामुख्याने, गंगापूर गावात नाल्याजवळ सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा फायटोरीड प्रकल्प उभारण्याबाबत निरीने काही सूचना केल्या होत्या. महापालिकेने सदर प्रकल्प उभारल्याचे सांगितले; परंतु त्याबाबत आपण समाधानी नसल्याचे निरीने पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाबाबत निरी गेल्या सहा महिन्यांपासून माहिती मागवित असताना महापालिकेकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे निरीला नाइलाजास्तव माहितीच्या अधिकाराचे हत्यार उपसावे लागले आहे. एका सरकारी संस्थेला महापालिकेकडून अशा प्रकारची वागणूक दिली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे, शिवाय त्यातून महापालिकेच्या भोंगळ कारभाराचेही दर्शन घडले आहे. (प्रतिनिधी)