निफाड : रविवारी सकाळी पाटलीपुत्र - लोकमान्य टिळक एक्स्प्रेस मुंबईकडे जात असताना उगाव रेल्वे स्थानकाजवळ एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून अचानक धूर निघू लागल्याने एक्स्प्रेस तातडीने थांबविण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती केल्यानंतर धूर निघणे थांबले.पाटलीपुत्र लोकमान्य टिळक अतिजलद एक्स्प्रेस रविवारी (दि. १) सकाळी १०.३० वाजता मुंबईकडे जात असताना उगाव रेल्वेस्थानकाजवळ एक्स्प्रेसच्या पाठीमागून तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वसाधारण बोगीतून धूर निघू लागल्याने गर्दी असल्याने दाटीवाटीत बसलेल्या प्रवाशांच्या ही बाब लक्षात येताच जोरदार आरडाओरडा सुरू झाल्याने शिवडी गावालगत मध्य रेल्वेच्या मार्गातच एक्स्प्रेस थांबविण्यात आली. गाडी थांबताच सर्वसाधारण बोगीतील प्रवासी खाली उतरले व इतर बोगीतील प्रवाशांना याबाबत सावध केले. तोपर्यंत बोगीतून धुराचे लोट बाहेर येताना दिसू लागले. (वार्ताहर)
धावत्या एक्स्प्रेसमधून धुराचे लोट
By admin | Updated: May 3, 2016 00:38 IST