निमित्त भारत सरकारतर्फे साजऱ्या होणाऱ्या सतर्कता सप्ताहानिमित्त हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतर्फे जागरूकता फेरी काढण्यात आली. राणेनगर येथील शारदा विद्यालयाचे विद्यार्थी आणि बॅण्डपथक अग्रभागी होते. सरदार पटेल यांना आदरांजली वाहून आणि विभागीय अधिकारी चारूदत्त धार्मिक यांनी हिरवा झेंडा दाखवून फेरीचा शुभारंभ केला. त्र्यंबक नाका भागात ही फेरी काढण्यात आली. जागरूकता शपथ घेतल्यानंतर फेरीचा समारोप करण्यात आला. विक्री अधिकारी वाराप्रसाद पल्ला, अमरजीसिंग, प्रभाकर कोकणे, अमोल जाधव, अजय मेहता, मनोज चांडक, विनय पालेजा, प्रदीप बूब, संजय नेटकर, बापू वावरे, महेश वाजे, दिलीप दीपक सोनवणे, अशोक कर्डिले, आदिंसह कंपनीचे वितरक सहभागी झाले होते.हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतर्फे सतर्कता, जागरूकता सप्ताहानिमित्त काढण्यात आलेल्या प्रबोधन फेरीचा शुभारंभ करताना विभागीय अधिकारी चारूदत्त धार्मिक, अमोल जाधव, संगीता जाधव, प्रभाकर कोकणे, अजय मेहता आदि.
हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे जागरूकता फेरी
By admin | Updated: November 2, 2015 22:42 IST