नाशिक : कॅन्सर हा अत्यंत वाईट शब्द असून, या शब्दाचा संबंध माझ्या वहिनीच्या निधनाच्या वेळी मला अत्यंत जवळून आला. मातोश्रीसमान असलेल्या वहिनींना या आजाराने हिरावून नेले. कर्करोगावर जनजागृती जरी सातत्याने होत असली तरी ती लोकसंख्येच्या तुलनेने अपुरी आहे. यासाठी सर्वांनी सर्वसमावेशक प्रयत्न करणे गरजेचे असून, या रोगाचे समूळ उच्चाटन होऊन नियंत्रण मिळवायला हवे, असे मत प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट यांनी व्यक्त केले. शहरातील सर्व कलाकारांनी आपल्या कलेद्वारे निरागस मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी व कर्करोगाशी सुरू असलेल्या त्यांच्या लढ्याला आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने चित्राकृती प्रदर्शनाच्या रूपाने सादर केल्या. ‘कलेवरील तुमचे प्रेम जीव वाचवू शकते’ या संकल्पनेनुसार चित्रकला प्रदर्शनाचे एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये शनिवारी (दि.७) उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून अवचट उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री विनायकदादा पाटील, प्रा. अनिल नाईक, वसंत नगरकर, डॉ. राज नगरकर उपस्थित होते. यावेळी अवचट म्हणाले, कर्करोग मोठा आजार असला तरी या आजाराबाबत भीती बाळगण्याचे कारण नाही, या आजारावर मात करण्यासाठी औषधोपचार व अत्याधुनिक वैद्यकीय उपचारपद्धती उपलब्ध झाल्या आहेत. कलावंत हादेखील एक माणूसच असतो. नाशिकच्या कलावंतांनी त्यांच्यामधील ‘माणूस’ जिवंत ठेवत आपल्या कलेच्या माध्यमातून लहान मुलांना जीवदान देण्यासाठी टाकलेले पाऊल कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. मुळात नाशिकच्या मातीचे हे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. येथील लोकांमध्ये रसिकतेसोबत मानवी संवेदनाही तितक्याच जिवंतपणे दिसून येतात.विनायकदादा यांनी, नाशिकच्या मातीत समाजाची वीण गुंफण्यासाठी लागणारा माणुसकी व करुणेचा ओलावा टिकून असल्याचे सांगितले. नाशिक हे झपाट्याने प्रगती करणाºया शहरांपैकी एक आहे. नाशिकमध्ये टाटा मेमोरियल रुग्णालयासारखी औषधोपचार करणारी व्यवस्था उपलब्ध होईल, असे कधीही वाटले नव्हते, असे ते यावेळी म्हणाले. नाईक यांनीही नाशिकच्या कलावंतांचे कौतुक करत त्यांनी आपल्या कलेचा समाजासाठी केलेला उपयोग वाखाणण्याजोगा असल्याचे सांगितले. यावेळी प्रदर्शनाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार कर्करोगाशी लढा देणाºया ‘त्या’ निरागस बालकांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. राज नगरकर यांनी केले व सूत्रसंचालन तन्वी अमीत यांनी केले.
कर्करोगाविषयी होणारी जनजागृती अपुरी सुभाष अवचट : एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:49 AM
नाशिक : कॅन्सर हा अत्यंत वाईट शब्द असून, या शब्दाचा संबंध माझ्या वहिनीच्या निधनाच्या वेळी मला अत्यंत जवळून आला. मातोश्रीसमान असलेल्या वहिनींना या आजाराने हिरावून नेले.
ठळक मुद्देरोगाचे समूळ उच्चाटन होऊन नियंत्रण मिळवायला हवेकलेचा समाजासाठी केलेला उपयोग वाखाणण्याजोगा