शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

दर्जेदार, समान शिक्षणाच्या हक्काचा जागर

By admin | Updated: November 13, 2014 00:35 IST

शिक्षण संघर्ष यात्रा : महापालिकेसमोर निदर्शने; महापौरांचा निषेध

नाशिक : ‘शिक्षण आमच्या हक्काचं...,’ ‘शिक्षणाचा बाजार बंद करा.., ‘शिक्षणमंत्री चले जाव... अशा घोषणांनी आज शहर परिसर दुमदुमून गेला होता. तरुण, ज्येष्ठ, महिलांनी रस्त्यावर उतरून मनमानी कारभार करणाऱ्या इंग्रजी शाळा, महापालिका प्रशासन, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासह शिक्षणमंत्र्यांविरोधात तीव्र घोषणाबाजी करत नाशिककरांचे लक्ष वेधले. दरम्यान, शिक्षण संघर्ष यात्रेतील सहभागी कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करून मनपा शिक्षण मंडळासह महापौरांचाही निषेध नोंदविला.दर्जेदार व समान सरकारी शिक्षण हक्काचा जागर करण्यासाठी देशातील वीस राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील सुमारे ४५ सदस्य संस्था, दोनशे समविचारी सामाजिक संघटनांसोबत घेऊन अखिल भारतीय शिक्षण अधिकार मंचाच्या वतीने भारतभरातून शिक्षण संघर्ष यात्रा सुरू केली असून, ही यात्रा आज (दि.१२) सकाळी शहरात पोहचली. दरम्यान, यात्रेचे नाशिकरोड येथील शिवाजी चौकामध्ये विविध संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर यात्रेचा रथ थेट शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाच्या उंबऱ्यावर जाऊन पोहचला. यावेळी कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या निष्क्रिय कारभाराविरोधी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. यावेळी उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांना विविध शैक्षणिक मागण्यांच्या पूर्ततेचे निवेदन देण्यात आले. पालकांवर अन्यायकारक फी वाढ लादणाऱ्या त्यानंतर तिडके कॉलनी येथील सेंट फ्रान्सिस शाळेभोवती शिक्षण संघर्ष यात्रेत सहभागी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार करून शाळा व्यवस्थापनाचा जाहीर निषेध करत घोषणाबाजी केली. महापालिक ा शिक्षण मंडळ प्रशासनाकडून जीपीओसमोरी बी. डी. भालेकर शाळा कायमस्वरूपी बंद करण्यासाठी केल्या जाणाऱ्या षडयंत्राविरोधी संघर्ष यात्रेच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारातही घोषणाबाजी व पथनाट्य सादर केले. भालेकर आणि अन्य शाळांच्या मागण्यांबाबत महापौरांकडे चर्चेसाठी गेलेल्या या कार्यकर्त्यांची समाधानकारक चर्चा झाली नाहची महापौरांनी चुकीची वागणूक दिली नाही आणि उपआयुक्त गोतीसे या विषयांकडे लक्ष पुरवत नाही असा आरोप करीत या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या यात्रेत शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच नाशिकचे डॉ. मिलिंद वाघ, संतोष जाधव, मुकुंद दीक्षित, श्रीधर देशपांडे, छाया देव, राजू देसले आदिंसह छात्रभारती संघटनेचे युवा कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)