शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार प्रदान

By admin | Updated: August 8, 2014 01:59 IST

‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार प्रदान

 

नाशिक : किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते डॉ. संजय गायकवाड, राजेश पंडित आणि नीलेश ठाकूर यांना ‘वसुंधरा मित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्रसिंह यांनी गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी नाशिककरांना सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.कुसुमाग्रज स्मारकात किर्लोस्कर क्लब आणि वसुंधरा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते झाले. याचवेळी जखमी प्राण्यांवर उपचार करणारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गायकवाड, गोदावरी प्रदूषणमुक्तीचा लढा उभारणारे राजेश पंडित आणि इको क्लबच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारे रचना विद्यालयातील शिक्षक नीलेश ठाकूर यांना सन्मानपत्र, मानचिन्ह देऊन वसुंधरा मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्रसिंह यांनी आगामी कुंभमेळा हा ग्रीनकुंभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत, गोदावरीच्या शुद्धिकरणासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले. यावेळी छायाचित्रकार ललित देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. संजय गायकवाड यांनी प्राण्यांविषयी निसर्गप्रेमींनी दाखविलेली तळमळच मला माझ्या कामावरील निष्ठा वाढवित गेल्याचे सांगितले. राजेश पंडित यांनी ग्रीन कुंभसाठी कृती आराखडा लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. नीलेश ठाकूर यांनी इको क्लबच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्रारंभी हेमंत बेळे यांनी स्वागत केले. किर्लोस्कर उद्योगसमूहाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मकरंद देवधर यांनी उद्योगसमूहाच्या पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. वीरेंद्र चित्राव यांनी महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश विशद केला. सूत्रसंचालन गौतमी देशमुख हिने केले. (प्रतिनिधी)