शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

साहित्यिक मेळाव्यात रंगला पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:57 IST

सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यात डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धा, कवी गोविंद काव्य स्पर्धा, साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक बालवाङ्मय आणि कवयित्री जयश्री पाठक पुरस्कार यांसारख्या विविध पुरस्कारांचे रविवारी (दि.२४) वितरण करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये लोकमतचे मुख्य उपसंपादक संजय वाघ यांचा समावेश आहे.

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यात डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धा, कवी गोविंद काव्य स्पर्धा, साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक बालवाङ्मय आणि कवयित्री जयश्री पाठक पुरस्कार यांसारख्या विविध पुरस्कारांचे रविवारी (दि.२४) वितरण करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये लोकमतचे मुख्य उपसंपादक संजय वाघ यांचा समावेश आहे. साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील, काव्यसंमेलनाच्या अध्यक्ष रेखा भांडारे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिल्हा साहित्यिक मेळाव्यातील पुरस्कार वितरण सोहळ्यात कवी गोविंद काव्य पुरस्कार नंदकिशोर ठोंबरे यांना, रवींद्र मालुंजकर यांना द्वितीय पुरस्कार तर राजेंद्र सोमवंशी यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला.  डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धेत रघुनाथ सावे यांना प्रथम, सुरेखा बोºहाडे यांना द्वितीय तर धनंजय आपटे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला. लक्ष्मीबाई टिळक बालवाङ्मय पुरस्कार ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक संजय वाघ यांना देण्यात आला. जयश्री पाठक स्मृती पुरस्कार रवींद्र कांगणे व रावसाहेब जाधव यांना देण्यात आला. या पुरस्कारांसाठी काशीनाथ वेलदोडे, अलका कुलकर्णी, विजयकुमार मिठे, डॉ. दिलीप पवार, शरद बिन्नोर, प्रशांत केंदळे व संतोष हुदलीकर, मिलिंद गांधी यांनी परीक्षकांची भूमिका पार पाडली. दरम्यान, साहित्यिक मेळाव्यात शनिवारी झालेल्या काव्यसंमेलनातील निवडक कवींनाही यावेळी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात शारदा गायकवाड यांना उत्कृष्ट महिला सादरीकरणासाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर गौरव आठवले व भीमराव कोते यांना उत्कृष्ट सादरीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिजित शिंदे व प्रशांत केंदळे यांना कवी कैलास पगारे पुरस्कार विभागून देण्यात आला.