शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या रोखण्यासाठी सायकल फेरीने प्रबोधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST

नाशिक : समाजातील आत्महत्या रोखण्यासाठी सायकल फेरी तसेच प्रत्येक सदस्याच्या खिडकीत दिवा लावून आयएमए नाशिक आणि नाशिक मानसोपचारतज्ज्ञ संघटनेतर्फे ...

नाशिक : समाजातील आत्महत्या रोखण्यासाठी सायकल फेरी तसेच प्रत्येक सदस्याच्या खिडकीत दिवा लावून आयएमए नाशिक आणि नाशिक मानसोपचारतज्ज्ञ संघटनेतर्फे प्रबोधनासाठी अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ यंदाच्या वर्षापासून करण्यात आला.

आत्महत्या ही एक जागतिक समस्या असून दिवसेंदिवस त्यात वाढ होताना दिसत आहे. या समस्येकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने १० सप्टेंबर हा दिवस दरवर्षी ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ म्हणून साजरा केला जातो.

पूर्ण जगात दरवर्षी ८ लाख आत्महत्या होतात, म्हणजेच प्रत्येक ४० सेकंदाला जगात कोणीतरी आयुष्य संपवते आहे. त्यापेक्षा २० पट जास्त लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. म्हणून आत्महत्या ही एक मोठी सामाजिक समस्या असून आत्महत्या प्रतिबंध ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे आयएमए अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी सांगितले. आत्महत्या थोपविण्यासाठी डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ यांच्या बरोबर समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न केले पाहिजे असे आयएमएचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी सांगितले. नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे आणि डॉ. मनीषा रौंदळ यांच्यासह डॉ. स्वाती चव्हाण, डॉ. जयंत ढाके, डॉ. नीलेश जेजुरकर, डॉ. अनूप भारती आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.