शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला खडबडून जाग

By admin | Updated: July 3, 2014 00:23 IST

महापालिकेला खडबडून जाग

 

नाशिक : पावसाळा सुरू होत असतानाही सुस्त असलेल्या पालिका प्रशासनाला शहराच्या एकाच भागात सहा संशयित डेंग्यू रुग्ण आढळताच खडबडून जाग आली आहे. अशोका मार्गावर पालिकेच्या आरोग्य पथकाने भेट देऊन साफसफाई केली, तसेच डासांची उत्पत्तीस्थाने आढळलेल्या बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावली आहे. दुसरीकडे पंचवटीतही एक रुग्ण आढळल्यानंतर महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन झाडाझडती घेतली.अशोका मार्ग येथील रॉयल कॉलनीत काल डेंग्यूचे संशयित सहा रुग्ण आढळले आहेत. त्यातील एका बालिकेची प्रकृती चिंताजनक आहे. उपमहापौर सतीश कुलकर्णी यांच्याच प्रभागात हा प्रकार घडल्याने पालिकेवर टीका होऊ लागली. त्याचबरोबर पंचवटीत रुग्ण आढळल्याने महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि स्वच्छतेच्या कामाविषयी विचारणा केली. गेल्यावर्षी जून महिन्यात डेंग्यूचे ११ रुग्ण आढळले होते. यंदा गेल्या महिन्यात चार रुग्ण आढळले होते. आणि आता जुलै महिन्यात सहा संशयित डेंग्यू रुग्ण आढळल्याची माहिती जीवशास्त्रज्ञ वैशाली पाटील यांनी दिली. आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली. संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, तर महासभेत ठरल्यानुसार अतिरिक्त सफाई कामगार अन्य विभागांत वर्ग का झाले नाही, याची विचारणा महापौरांनी केली. सफाई कामगारांच्या बदल्यांचे अधिकार आरोग्याधिकाऱ्यांचे असताना बदल्यांची फाईल आयुक्तांकडे का गेली, असे अनेक प्रश्न महापौरांनी विचारले. पश्चिम विभागात सुमारे तीनशे ते चारशे सफाई कामगार असून, आपल्या प्रभागात तर ७० सफाई कामगार आहेत. अतिरिक्त सफाई कामगारांना अन्य विभागांत नियुक्त करा, असे आदेश त्यांनी दिले. १७ सफाई कामगारांच्या आवश्यक त्या ठिकाणी बदल्या करण्यात येत असल्याचे आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनीदेखील आरोग्याधिकारी डॉ. बुकाणे, जीवशास्त्रज्ञ डॉ. पाटील तसेच नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घुगे यांची बैठक घेतली. अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश उपमहापौरांनी बैठकीत दिले. (प्रतिनिधी)