शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंबे दिंडोरी ते मोहाडी रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 16:07 IST

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्ता दूरुस्ती च्या प्रतिक्षेत.सदर रस्त्यावर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्त्याचा अक्षरशः रस्त्याचा फज्जा उडाला आहे.ठिक-ठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. सदर रस्त्यावर वाहन चालवितांना चालकाचा तोल जावून अपघात होत आहे.दिंंडोरी पंचायत समितीच्या संबंधीत दळणवळण विभागाने तात्काळ दिलेल्या निवेदनाची दखल घेवून या रस्त्याची दूरुस्ती करावी, अशी मागणी रिपाइंचे युवा तालुकाध्यक्ष सागर गायकवाड व शेतकरी सुभाष.पी.वाघ,संदिप कड,गणेश कुंभार, सौरभ गायकवाड, गणेश गांगुर्डे यांनी निवेदना द्वारे मागणी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा व सर्व पक्षीयच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्ता दूरुस्ती च्या प्रतिक्षेत.सदर रस्त्यावर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्त्याचा अक्षरशः रस्त्याचा फज्जा उडाला आहे.ठिक-ठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. सदर रस्त्यावर वाहन चालवितांना चालकाचा तोल जावून अपघात होत आहे.दिंंडोरी पंचायत समितीच्या संबंधीत दळणवळण विभागाने तात्काळ दिलेल्या निवेदनाची दखल घेवून या रस्त्याची दूरुस्ती करावी, अशी मागणी रिपाइंचे युवा तालुकाध्यक्ष सागर गायकवाड व शेतकरी सुभाष.पी.वाघ,संदिप कड,गणेश कुंभार, सौरभ गायकवाड, गणेश गांगुर्डे यांनी निवेदना द्वारे मागणी केली आहे. सदर रस्ता हा इ.जि.मा.क्र १९७ व ग्रामीण मार्ग १८ हा दहा ते बारा वर्षा पासून नादुरुस्त आहे. या रस्त्यावर एवढ्या वर्षात कधी डागडुजी करण्यात आली नाही. या रस्त्याकडे दिंडोरी पंचायत समितीच्या दळणवळन विभागाने कायमच कानाडोळा केला आहे. सदर रस्त्यावर म्हसरूळ मार्गे मोहाडि शहर बस (सीटि बस)सेवा सुरू आहे. ही शहर बस सेवा दिवसातून बारा फेऱ्या करते. तसेच मोहाडी येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असून वरवंडी,शिवनई,आंबेदिंडोरी व गणोरवाडि येथील विद्यार्थ्यांना सदर रस्त्याने शिक्षणासाठी दररोज ये-जा करावी लागते परंतु सदर रस्ता बिनकामी झाल्याने शहर बस सेवा कोरोना महामारी येण्याअगोदर पासून म्हणजे जानेवारी२०१९ पासून नियमितपणे शहर बससेवेच्या फेऱ्या रद्द झालेले आहे.शहर बस सेवा बंद असली की या मार्गावरील विद्यार्थ्यांना दहा-पंधरा किलोमीटर ची पायपीट करीत घरचा रस्ता गाठावा लागतो.यावर लोकप्रतिनिधी ना लाज कशी वाटत नाही.मत मागण्याच्या वेळेस जनतेकडे येता मग मतांची भीक मागायला आता कुठं ठेवली.लोकप्रतिनिधींनी लाज-लज्जा यापुढे जाऊन सदर रस्ता हा खेडगाव,बोपेगाव,जऊळके-वणी, मातेरेवाडी,लोखंडेवाडी,जोपुळ,खडक-सुकेना,कुर्नोली, कोराटे,मोहाडी अशा अनेक गावांना नाशिक येथील मुख्य बाजारपेठेला भाजीपाला घेऊन जाण्याचा जवळचा मार्ग आहे. सदरचा रस्ता हा सोयीस्कर असल्याने वर्दळ मोठ्या प्रमाणात राहाते प्रवाशांना नाशिकला जाण्याचा जवळचा मार्ग आहे. व याच मार्गाने प्रवासी व शेतकरी जाण्यास पसंत करतात.सदर रस्ता अरुंद असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूकडिल कडेला झाडे-झूडपांणी दुतर्फा दाटि झाल्याने वाहन चालकांना झाडा-झुडपांंच्या आड असलेल्या वाहानांचा अंदाज येत नाहि.तर खड्डे वाचविण्याच्या विवंचणेत वाहन चालक असल्याने वाहानावरचे नियंत्रण सुटल्याने मोठ-मोठे अपघात होतात.या रस्त्यावर दिवसेंदिवस लहान मोठे अपघातांचे प्रमाण वाढतच चाले आहे.यातून एखाद्याचा जीव गमवावा लागतो कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधीत विभागाने तात्काळ रस्त्याची दूरुस्ती करावी, अन्यथा दूरुस्ती न झाल्यास पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या व सर्व पक्षीय वतीने आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला.सदर रस्ता हा मार्च २०१७ मंजूर झाला होता , परंतू विधान परिषदेचे उपाध्यक्ष आमदार नरहरि झिरवाळ यांनी रद्द केला.- सारिका नेहरे. जि. प. सदस्या.सदर रस्त्या बाबत आमच्या विभागाचे शाखा अभियंता यांना तात्पुरत्या उपायोजना करण्याचे आदेश दिले आहे.व वरिष्ठ पातळीवर कळविण्यात आले आहे.- किरण पवार, इ.व.द उप अभियंता दिंडोरी.ठळक मुद्दे*शेतकऱ्यांचा व सर्व पक्षीय यांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा ईशारा.*वाहन चालकांचे नियत्रण सुटल्याने मोठे मोठे अपघात होतात.*विधान परिषदेचे उपाध्यक्ष मा.आमदार नरहरि झिरवाळ यांनी रद्द केला. 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग