शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

पडताळणी अहवाल सादर करण्यास टाळाटाळ;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:50 IST

मालेगाव : तालुक्यातील १५८ अपंग प्रमाणपत्रधारक शिक्षकांच्या मुळ प्रमाणपत्रांची गेल्या २१ डिसेंबर २०१७ रोजी येथील पंचायतीच्या सभागृहात पाच सदस्यीय समितीने पडताळणी केली होती. मात्र या पडताळणी समितीने राजकीय दबावापोटी व आर्थिक हितसंबंधातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे अहवाल सादर करण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. तर या पडताळणीत संशयास्पद आढळलेल्या सहा ...

ठळक मुद्देबोगस अपंग शिक्षक : लोकप्रतिनिधींचा राजकीय दबाव अधिकाऱ्यांकडून अभय

मालेगाव : तालुक्यातील १५८ अपंग प्रमाणपत्रधारक शिक्षकांच्या मुळ प्रमाणपत्रांची गेल्या २१ डिसेंबर २०१७ रोजी येथील पंचायतीच्या सभागृहात पाच सदस्यीय समितीने पडताळणी केली होती. मात्र या पडताळणी समितीने राजकीय दबावापोटी व आर्थिक हितसंबंधातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे अहवाल सादर करण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. तर या पडताळणीत संशयास्पद आढळलेल्या सहा पेक्षा अधिक शिक्षकांना अधिकारी व पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी राजाश्रय दिल्याने कारवाई टाळली जात आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य शिक्षकांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील बोगस अपंग शिक्षक संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. त्यातच जिल्ह्यात सर्वाधिक अपंग शिक्षकांची संख्या मालेगाव तालुक्यात आहे. एक हजार २११ कार्यरत शिक्षकांपैकी १५८ शिक्षकांकडे अपंग असल्याचे प्रमाणपत्र आहे. अपंग भत्ता लागू होणाºया अस्थिव्यंग, अल्पदृष्टी, कर्णबधीर कर्मचाºयांबाबत खात्री करुन विशेष अपंग भत्ता मिळण्यास पात्र असल्याबाबत तसेच अपंग प्रमाणपत्र बोगस नसल्याची खात्री करुन तसा अहवाल गटशिक्षण अधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर करणे गरजेचे होते. अपंग प्रमाणपत्र तपासणी समितीचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, सदस्य तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेशकुमार निकम, डॉ.एकबाल अहमद अब्दूल नबी, डॉ. अभिजीत सोनजे, सचिव तथा गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी यांच्यात समन्वय नसल्याने अहवालाचे कामकाज रखडले आहे. या अहवालानुसार काही शिक्षक प्रथम दर्शनी दोषी आढळून आले आहेत. या अहवालानुसार सहा संशयित शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली असली तरी काही बोगस शिक्षकांची नावे समितीच्या अधिकाºयांनी व पंचायत समितीच्या काही सदस्यांनी अर्थपूर्ण घडामोडी करीत बोगस अपंग शिक्षकांना अभय दिले आहे. या घडामोडींमुळे पडताळणी मोहीम केवळ फार्स ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. बोगस अपंग शिक्षक शोध मोहिमेत आढळून आलेल्या बोगस शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने अभय दिल्यामुळे कुंपणच शेत खात असल्याचाप्रकार घडला आहे. या प्रकरणीमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी लक्ष घालून संशयित अपंग शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.सुरक्षाजिल्ह्यात यापूर्वी दहा बोगस अपंग शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर मात्र अपंग शिक्षक शोध मोहिमेकडे वरिष्ठ अधिकाºयांनी डोळेझाक केली आहे. आता बदली प्रक्रिया सुरू झाली असून पुन्हा बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करुन शिक्षक सोयीचे ठिकाण व अपंग भत्ता मिळवून घेण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. शासनाची अप्रत्यक्षरित्या फसवणूक करणाºया बोगस अपंग शिक्षकांना शिक्षण विभागानेच अभय दिले असेल तर कारवाईची अपेक्षा कोणाकडून करायची असा सवाल निर्माण झाला आहे.