शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीच्या वैधतेची माहिती देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:07 IST

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची मतदार यादी जाहीर करण्यापूर्वी या मतदारसंघातील मतदारांचे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार फॉर्म १७ भरून न घेण्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कृत्यावर निवृत्त नायब तहसीलदारांनीच प्रश्न उपस्थित करून घरचा आहेर दिला आहे. यासंदर्भात लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकाºयांकडे माहिती मागविण्यात आली असून, दहा दिवस उलटूनही प्रशासनाने या पत्राची साधी दखलही न घेतल्याने दडपादडपी केली जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

ठळक मुद्देमतदार यादीच्या कायदेशीर वैधतेबद्दलच प्रश्नचिन्ह मतदारांच्या अर्जाची माहिती गुलदस्त्यात

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची मतदार यादी जाहीर करण्यापूर्वी या मतदारसंघातील मतदारांचे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार फॉर्म १७ भरून न घेण्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कृत्यावर निवृत्त नायब तहसीलदारांनीच प्रश्न उपस्थित करून घरचा आहेर दिला आहे. यासंदर्भात लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकाºयांकडे माहिती मागविण्यात आली असून, दहा दिवस उलटूनही प्रशासनाने या पत्राची साधी दखलही न घेतल्याने दडपादडपी केली जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या जुन्या मतदार याद्या रद्द करून नवीन मतदार यादी तयार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्यामुळे या दोन्ही मतदारसंघात यापूर्वी जुन्या याद्या गृहीत धरून नव्याने मतदार नोंदणी करण्याचा निर्णय आयोगाने रद्दबातल ठरवून शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी नवीन मतदार नोंदणी करण्याचे आदेश राज्य आयोगाला दिले होते. त्यानुसार नाशिक विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी नवीन याद्या तयार करण्यात आल्या होत्या. यासंदर्भातील आदेश देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ५ सप्टेंबर २०१६ रोजी काढलेल्या परिपत्रकातच विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारांसाठी देखील फॉर्म १७ भरून त्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आदेश कलम ६ मध्ये दिले आहेत. असे असताना नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदार यादी त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाºयांकडून प्रमाणित करून घेऊन जाहीर करण्यात आल्याने या मतदार यादीच्या कायदेशीर वैधतेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राजकीय व शासकीय पातळीवर त्याचे पडसाद उमटले. विशेष म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी जाहीर केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या मतदार यादीवर जिल्हा निवडणूक शाखेतील निवृत्त नायब तहसीलदारांनीच प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला घरचा आहेर दिला आहे. या पत्राद्वारे नायब तहसीलदारांनी काही प्रश्नांची उत्तरे व माहिती मागविली असून, पत्र देऊन दहा दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप त्याची माहिती दिली जात नसल्याने नक्कीच कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय घेतला जात आहे.मतदारांच्या अर्जाची माहिती गुलदस्त्यातनिवडणूक शाखेच्या निवृत्त नायब तहसीलदारांनी या मतदार यादीच्या वैधतेची खात्री करण्यासाठी थेट जिल्हाधिकाºयांनाच पत्र लिहून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्था मतदार यादी तयार करताना प्राप्त फॉर्म नंबर १७ ची माहिती मिळावी ही विनंती. या मतदार यादीच्या प्रसिद्धी अगोदर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदसिद्ध सदस्य यांनी फॉर्म नंबर १७ भरून नाव नोंदणी केली असल्यास एकूण किती फॉर्म प्राप्त झाले त्याची माहिती मिळावी तसेच प्राप्त फॉर्मपैकी मंजूर फार्मची संख्या किती? महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी यांनी फॉर्म नंबर १७वर नोंदविलेल्या अभिप्रायासह माहिती मिळावी, अशी विनंती केली आहे. परंतु अद्यापही ही माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही हे विशेष.