शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक टाळा; डस्टबिन वापरा

By admin | Updated: September 19, 2015 22:39 IST

आवाहन : राज्य शासनाकडून लघुसंदेशामार्फत जागृती

नाशिक : हरित कुंभमेळा संकल्पना यशस्वीपणे राबविण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे. कुंभमेळ्याच्या अखेरच्या तिसऱ्या शाहीस्नानाच्या पार्श्वभूमीवर विविध कंपन्यांकडून राज्य शासनामार्फत भाविकांना प्लॅस्टिक टाळा; डस्टबिन वापरा असा लघुसंदेश पाठविण्यात येत होता. प्रदूषण रोखण्यासाठी अन् पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शासनाकडून कुंभमेळ्यानिमित्त आलेल्या भाविकांमध्ये लघुसंदेशामार्फत जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.‘महाराष्ट्र सरकार आपका कुंभनगरी में स्वागत करती हैं, बस सुविधा बाह्यस्थानक से उपलब्ध हैं’ ‘प्लॅस्टिक मत वापरना, कुडादान का प्रयोग करे’ असे हिंदी-इंग्रजी भाषेतून लघुसंदेश विविध नेटवर्क पुरविणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचविले जात होते. राज्य शासनाकडून या जागृतीपर संदेशाबरोबरच भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मदतवाहिनी क्रमांकही लघुसंदेशामध्ये देण्यात आले होते.भाविकांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण व्हावी आणि पर्यावरणाचे संतुलन टिकून राहण्यास मदत व्हावी या हेतूने लघुसंदेशामार्फत जनजागृती करण्यावर भर दिला गेला. शाहीस्नानाच्या तीनही पर्वण्यांच्या दिवशी राज्यशासनामार्फत भ्रमणध्वनीच्या नेटवर्कची सेवा पुरविणाऱ्या विविध कंपन्यांकडून पर्यावरणपूरक जनजागृतीपर लघुसंदेश पाठविण्यात आले. संवाद साधण्याची सुलभ साधने या आधुनिकतेच्या युगात उपलब्ध झाली असून त्यामार्फत एकाचवेळी अनेकांशी थेट संवाद साधता येणे शक्य झाले आहे. याचा फायदा कुंभमेळ्यामध्ये दिसून आला. सोशल मीडियाचे शासकीय यंत्रणेकडून विविध ‘ग्रुप’ तयार करून त्याद्वारे आपआपसांमध्ये संवाद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबरोबरच राज्यशासनाचे प्रबोधनात्मक लघुसंदेशही आधुनिकतेचा वापर करत विविध कंपन्यांनी आपआपल्या ग्राहकांपर्यंत शासनाचा ‘संदेश’ पोहचविला.