शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा पंचायत समितीला लावले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 20:46 IST

सटाणा : बागलाण पंचायत समितीमधील लघुपाटबंधारे विभागातील अधिकारी अकार्यक्षम असून, कार्यालयीन कामकाज वेळेत उपस्थितीत राहात नसल्याच्या निषेधार्थ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप लाऊन ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देसटाणा : मुजोर अधिकाऱ्यांविरुद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

सटाणा : बागलाण पंचायत समितीमधील लघुपाटबंधारे विभागातील अधिकारी अकार्यक्षम असून, कार्यालयीन कामकाज वेळेत उपस्थितीत राहात नसल्याच्या निषेधार्थ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप लाऊन ठिय्या आंदोलन केले.

गटविकास अधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीद्वारे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बागलाण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बागलाण पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारास मंगळवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता कुलूप लावले.जलसंधारण विभागाचे अधिकारी कार्यालयाच्या निर्धारित वेळेत उपस्थितीत राहात नाहीत. भेटावयास गेलेल्या शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात. शेतकऱ्यांचे समाधान न करता, त्यांना माघारी पाठवितात. चिरीमिरी मागण्याचा प्रयत्न होतो. अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांची बदली करावी, यासाठी सुमारे तासभर प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.गटविकास अधिकारी कार्यालयीन कामकाजासाठी लखमापूर येथे दौऱ्यावर असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राकेश सोनवणे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. आंदोलनाविषयीची संपूर्ण माहिती गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली.संबंधित जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करावी, अन्यथा आठ दिवसांनंतर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा दिला. कार्यालयीन अधीक्षकांकडे याबाबतचे निवेदन देण्यात आले.त्यानंतर, योग्य कारवाई करू, असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी उमेश आहिरे, उदय नेरकर, वैभव बिरारी, शुभम खैरणा, जावेद कुरेशी, शोएब शेख, आकाश ठाकरे, तेजस शेवाळे, सनी ठाकरे, विजय शिंदे, गौरव आहीरे, दानिश शेख, मनोज जाधव यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

टॅग्स :electricityवीजagricultureशेती