शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साकोऱ्यात बॅँकेला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:05 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील नागरिकांनी बॅँक कर्मचाऱ्यांच्या अरेरावी व वेळेवर कामे होत नसल्याची तक्रारी करत भारतीय स्टेट बॅँकेच्या साकोरा शाखेला कुलूप ठोकत बाहेर तासभर संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देकामे होत नसल्याची तक्रार : आश्वासनानंतर आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील नागरिकांनी बॅँक कर्मचाऱ्यांच्या अरेरावी व वेळेवर कामे होत नसल्याची तक्रारी करत भारतीय स्टेट बॅँकेच्या साकोरा शाखेला कुलूप ठोकत बाहेर तासभर संताप व्यक्त केला.ग्रामीण भागातील जनतेला गावातच राष्टिÑयीकृत बॅँकेच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने सन २०१६ मध्ये साकोरा येथे स्टेट बॅँकेची सुरू करण्यात आली. सुरुवातीला वर्षभर गावातीलच कर्मचारी असल्याने कोणालाही कुठलीच अडचण आली नव्हती. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बॅँकेत शाखाधिकारी आणि कर्मचारी हे बाहेरगावचे असल्याने ते अरेरावी करतात. खातेदारांशी उद्धटपणे बोलतात. ज्येष्ठ नागरिकांना दोन-दोन तास बसून ठेवतात व नंतर थम्स येतनसल्याचे कारण देतात. पीककर्जाचीव्यवस्था केलेली नाहीआदी तक्रारींचा समावेश असलेले निवेदन जि. प. सदस्य रमेश बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शाखाधिकारी श्रेयस सातोकर यांना देण्यातआले.जि.प. सदस्य बोरसे यांनी वरिष्ठ पातळीवर फोनवर बातचीत करून शाखाधिकारी यासह कर्मचाºयांच्या बदलीसंदर्भात चर्चा केली. त्यावर शाखाधिकारी सातोकर यांनी उपस्थितांची माफी मागून बँकेच्या कारभारात सुधारणा होईल, असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी कुलूप उघडले व कामकाजाला सुरुवात झाली.यावेळी उपसरपंच सतीश बोरसे, दादा बोरसे, संजय सुरसे, भगवान निकम, सतीशा सोनवणे, देवीदास बोरसे, इंदूबाई बोरसे,विमलबाई बोरसे, लक्ष्मण बोरसे, अलकाबाई पवार, मंडाबाई मोरे, संतू मोरे, भास्कर अभंग, कमळाबाई बोरसे, नमर्दाबाई बोरसे, चंद्रकला बोरसे, राजेंद्र सुरसे, संजय बोरसे, भारत बोरसे, सुमनबाई कदम, हिराबाई हिरे, रोशनी चव्हाण, रामकृष्ण बोरसे, श्रावण बोरसे, शिवाजी बच्छाव आदी नागरिक उपस्थित होते.नागरिकांसाठी स्टेट बॅँक शाखेची स्थापना करण्यात आली. तिचा नागरिकांना उपयोग होत नसेल तर काय फायदा? बॅँकेच्या कामकाजात वेळीच सुधारणा झाली नाही तर पुन्हा टाळे ठोकण्यात येईल.- रमेश बोरसे, जि. प. सदस्य, साकोरासुरूवातीला खातेदारांची संख्या कमी असल्याने सर्व कामे वेळेत पूर्ण होत होती. मात्र चार वर्षांत खातेदारवाढल्याने कर्मचारी अभावी कामे वेळेवर पूर्ण होत नाही. शाखेत एकच कर्मचारी आहे. माझ्या हातात कॅशचा व्यवहार नाही. शाखाधिकारी म्हणून माझ्या अखत्यारित येणारे सर्व कामे मी पूर्ण करतो.- श्रेयस सातोकर, शाखाधिकारी, स्टेट बॅँक, साकोरा

टॅग्स :bankबँकlocalलोकल