शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

गोदावरीचे प्रदूषण टाळा, फक्त ६० दिवस!

By admin | Updated: March 29, 2015 00:45 IST

पोलिसांचा अजब खाक्या : आदेश देऊन झाले मोकळे, मात्र यंत्रणेकडून कारवाई थंडच

नाशिक : गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे आता शासकीय यंत्रणांनी हातपाय हलविण्यास सुरुवात केली असून, नव्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच आता पोलीस आयुक्तांनीही प्रदूषण रोखण्यासाठी आदेश काढले. गोदापात्रात प्रदूषण केल्यास थेट फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे. अर्थात ८ मार्च ते ६ मे २०१५ अशा साठ दिवसांसाठीच हे आदेश असल्याने त्यानंतर काय पुन्हा गोदावरी नदीपात्रात मोटारी धुण्यास परवानगी आहे काय, असा असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी किंवा पोलीस उपआयुक्तांनी आदेश जारी केले असले तरी कागदोपत्री असलेल्या आदेशांची अंमलबजावणी नक्की केव्हा येणार आणि त्यासाठी यंत्रणा तरी अस्तित्वात आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गोदावरी नदीतील वाढते प्रदूषण लक्षात घेऊन नाशिकमधील पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सुमारे दीड वर्षांपासून उच्च न्यायालयात सुनावणीसाठी असलेल्या या याचिकेदरम्यान उच्च न्यायालय विविध प्रकारचे आदेश देत आहेत. इतकेच नव्हे तर छोट्या-छोट्या गोष्टींसाठी न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीही गठीत करण्यात आली आहे. तथापि, प्रदूषण रोखण्यासाठी थेट आणि टिकावू उपाययोजना होत नाहीत. मध्यंतरी नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी न्यायालयाच्या एकंदर आदेशाचा विचार करून एकाच दिवसात चार विभागांना चार कायदेशीर आदेश दिले. त्यानुसार जिल्हा परिषद, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, भूमी अभिलेख विभाग आणि महापालिकेला गोदापात्रालगतची अतिक्रमणे आणि बांधकामे हटविण्याचे आदेश दिले. भूजल सर्र्वेक्षण विभागाला जलस्त्रोत पुनरुज्जीवनासाठी अ‍ॅक्विफर मॅपिंगचे काम सत्वर हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. जलसंपदा विभागाला नदीच्या हद्दीत निळी आणि लाल रेषा आखण्याची कार्यवाही अवघ्या एक महिन्यात निशुल्क पूर्ण करण्यास सांगितले आहेत, तर भूमीअभिलेख विभागास गोदावरी नदीपात्रालगत असलेल्या शासकीय जमिनींची निशुल्क मोजणी करण्याचे आदेशदेखील दिले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशांपाठोपाठ आता पोलीस उपआयुक्तपुढे सरसावले आहेत. गोदावरी नदीत वाहने आणि कपडे धुतल्यास फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता १९७३चे कलम (१)(२) अन्वये कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्थात हे आदेश केवळ ८ मार्च ते ६ मे दरम्यान लागू करण्यात येणार असल्याने त्यापुढील कालावधीत प्रदूषण केल्यास कारवाई होणार नाही काय असा चमत्कारिक प्रश्न निर्माण झाला आहे. मुळात अशा प्रकारची कारवाईचा बडगा उभारण्याआधी पोलिसांनी कोणती यंत्रणा उभी केली आहे, हे महत्त्वाचे आहे. गोदावरी नदीत अशाप्रकारे प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयाने यापूर्वीच एक उपनिरीक्षक आणि २४ पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत; परंतु यासंदर्भातील प्रस्ताव गृहखात्याकडे पाठविल्याचे सांगून पोलीस यंत्रणेने अशाप्रकारे स्वतंत्र पथक नियुक्त केलेले नाही, तर गोदावरी नदी ज्या ज्या भागातून जाते, त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदूषण थांबविण्यासाठी स्वतंत्र पोलीस पथक नियुक्त करण्याचे राज्यशासनाचे आदेश आहेत. तथापि, पोलीस खात्याने आपल्या पातळीवर त्याची अशी उपाययोजना केली आहे. (प्रतिनिधी)