शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 17:28 IST

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी विविध विकास सोसायटी ही मुख्य अर्थवाहिनी आहे. तथापि, सद्यस्थितीत ही संस्था आर्थिक डबघाईला आली असून, नियमितपणे कर्जफेड करणा-या सभासदांना या संस्थेद्वारे पीककर्ज मिळत नसल्याचे भयानक वास्तव आहे. चालू हंगामात अशा सभासदांना पीककर्ज मिळण्याची मागणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण नागरे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.

ठळक मुद्देनियमितपणे कर्जफेड करणारे सभासद जिल्हा उपनिबंधकांकडे मागणी

नाशिकरोड : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी विविध विकास सोसायटी ही मुख्य अर्थवाहिनी आहे. तथापि, सद्यस्थितीत ही संस्था आर्थिक डबघाईला आली असून, नियमितपणे कर्जफेड करणा-या सभासदांना या संस्थेद्वारे पीककर्ज मिळत नसल्याचे भयानक वास्तव आहे. चालू हंगामात अशा सभासदांना पीककर्ज मिळण्याची मागणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण नागरे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील विविध विकास सहकारी संस्थांची स्थिती कमालीची ढासळली असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची हक्काची अर्थवाहिनी समजली जाणारी ही संस्था आर्थिक समस्येच्या बिकट परिस्थितीत वाटचाल करत आहे. नाशिक तालुक्यातील चाडेगाव येथील सोसायटी स्थापन झाल्यापासून शंभर टक्के कर्जफेड करत आहे. नोटाबंदी काळातही संस्थेच्या सभासदांनी वेळेत कर्जफेड करूनही कर्ज व कर्जमाफी किंवा प्रोत्साहन रक्कम मिळाली नसल्याचे सोसायटी चेअरमन नागरे यांनी निवेदनात नमूद केले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत १० टक्के सभासदांना कर्जमाफी रक्कम आली असून, शासनाच्या धोरणानुसार याच थकबाकीदार सभासदांना कर्जवाटप केले जाणार आहे. त्यामुळे नियमित कर्जफेड करणा-या उर्वरित सभासदांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाराज सभासद इतर राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्ज घेण्यासाठी गेल्यास भविष्यात सोसायटीच्या आर्थिक उलाढालीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. एकीकडे संस्था चालवणे, कर्मचाºयांना पगार देणे आदी अन्य खर्च वाढत आहे. अशीच स्थिती जिल्ह्यातील बहुतेक विविध विकास संस्थांची आहे. शेतकºयांची हक्काची अर्थवाहिनी असणारी ही संस्था टिकवण्यासाठी चालू हंगामात संस्थेमार्फत पीककर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी नागरे यांनी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.