दुसऱ्या लाटेमधील गंभीर परिस्थिती गर्दीची ठिकाणे न टाळल्या कारणाने झाली आहे. आपल्या आजूबाजूला सततच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात कुठलीही लक्षणे नसलेल्या व्यक्ती फिरतात हे ओळखू न शकल्याने आपल्यावरील आघात वाढले आहेत. स्वतःसह कुटुंबातील सर्वांनाच जपण्याची जबाबदारी आपली आहे. आता सद्य परिस्थितीमध्ये आपले घर हेच सुरक्षित ठिकाण असून घरात जेवढे सुरक्षित आहात तेवढे सुरक्षित कुठेच असू शकत नाही. आपण संयम राखा, घरातच राहा. आपण यामधून लवकरच बाहेर पडू यामध्ये शंका नाही.
लसीकरण ही दुसरी बाजू फार महत्त्वाची असून कुटुंबातील वरिष्ठ किंवा दुर्धर आजारांनी ग्रस्त व्यक्तींना त्वरित लसीकरण केल्यास भविष्यात येणाऱ्या संकटांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. आपण आपल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी लसीकरण हाच महत्त्वाचा रामबाण उपाय असून त्वरित लस घ्या आणि सुरक्षित रहा.
लस घेतल्यास ८० टक्के सुरक्षिततेची हमी आहे. आपण सर्वांनी पहिला डोस घेऊन स्वतःला सुरक्षित करावे आणि पुढील संकटांना सामोरे जाण्यासाठी लस हीच आपल्याला ढाल ठरू शकते यात शंका नाही.
डॉ. संजय सदावर्ते, वैद्यकीय अधीक्षक, घोटी (२९ संजय सदावर्ते)
===Photopath===
290421\29nsk_31_29042021_13.jpg
===Caption===
०९ संजय सदावर्ते