शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
9
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
10
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
11
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
12
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
13
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
14
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
15
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
16
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
17
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
18
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
19
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
20
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO

पुरेशी झोप नसेल तर व्यायाम टाळा

By admin | Updated: July 16, 2017 00:24 IST

श हरात मागील पंधरवड्यात ‘फिटनेस’ राखण्यासाठी विविध प्रकारे व्यायाम करताना तिघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनांचे कारण एक समान आढळून येते.

एक्सपर्ट व्ह्यूडॉ. दीपक सोनवणी । श हरात मागील पंधरवड्यात ‘फिटनेस’ राखण्यासाठी विविध प्रकारे व्यायाम करताना तिघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनांचे कारण एक समान आढळून येते. ते म्हणजे पुरेशी झोप न झाल्यामुळे व्यायाम करताना रक्तपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणे. शहरात जीममध्ये व्यायाम करताना तसेच सायकल चालविताना तरुणांच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर या तरुणांपैकी कोणीही आजारी नव्हते, तसेच हृदयरोगाशी संबंधित लक्षणेही कोणामध्ये नव्हती. मी मागील पंधरा वर्षांपासून बॉडी बिल्डिंग या खेळाशी संबंधित आहे. व्यायाम के ल्यामुळे शरीर सृदृढ राहते, यात शंका नाही; मात्र व्यायामाला पुरेशी झोप, आहार, पथ्ये यांची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे. कुठलाही हाय-इन्टेन्सीटी व्यायाम करण्यापूर्वी झोप पाच तासांपेक्षा कमी झालेली नाही ना याची खात्री करणे गरजेचे आहे. झोप कमी झालेली असल्यास शरीरामध्ये टीएनएफ-अल्फा आणि सी रिअ‍ॅक्टीव प्रोटीन हे टॉक्सीक घटक वाढण्याची शक्यता असते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अपुरी झोप झाल्यामुळे उच्च रक्तदाबालाही निमंत्रण मिळू शकते. तसेच २५ ते ५० वयापर्यंत उच्च रक्तदाब व हृदयविकारात वाढत होण्याची शक्यता तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत असते. जेव्हा पाच तासांपेक्षा कमी झोप झालेली असते तेव्हा दिवसभर थकवा, चिडचिडेपणा, कंटाळवाणा, निरुत्साह जाणवतो. अशा स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘रेम’ असे म्हटले जाते.  व्यक्तीला हृदयविकाराची लक्षणे आढळून आलेली नसेल तरीदेखील जर अपुरी झोप घेऊन अशा व्यक्तीने फास्ट कार्डिओ व्यायाम, वेटलिफ्टिंग, सायकलिंग, केले तर रक्तदाब वाढून मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा होण्याचा धोका असतो. अतिउच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या फाटूदेखील शकतात आणि व्यक्ती दगावू शकते. त्यामुळे किमान सहा तास पुरेशी झोप आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी. त्याशिवाय व्यायाम करणे धोक्याचे ठरेल, हे लक्षात घ्यावे.  - (उपाध्यक्ष, बॉडीबिल्डिंग असोसिएशन, इंडिया)