नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वंचिताना प्रवेश देण्यासाठी नियमावली असतानादेखील आपल्या पाल्यास मविप्रच्या होरायझन अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार पंचवटीतील मनोज बळवंत चित्ते यांनी केली आहे.पद्मलक्ष्मी मनोज चित्ते या विद्यार्थिनीने शिक्षणाधिकाऱ्यां- मार्फत होरायझन अकॅडमीत पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी अर्ज दाखल केला होता. शाळेचे शिक्षक संपर्कातही होते. त्यांनी शाळेसाठी देणगीची मागणी केली. ही रक्कम भरू न शकल्याने त्यांनी प्रवेश देण्यास नकार दिला. यासंदर्भात उच्च न्यायालयातील एका आदेशाच्या आधारे प्रवेश देण्यासाठी संबंधिताना विनंती केल्यानंतर शाळेने पुढील आठवड्यात प्रवेश देण्याची तयारी दर्शवली, मात्र १६ सप्टेंबर रोजी दूरध्वनी करून प्रवेशाची मुदत संपल्याने आता प्रवेश देता येणार नाही, असे शाळेने सांगितल्याने आता पद्मलक्ष्मीचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे चित्ते यांनी मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
शाळेत प्रवेश देण्यास टाळाटाळ
By admin | Updated: October 4, 2015 00:05 IST