नाशिक : सद्यस्थितीत द्राक्ष व भाजीपाला उत्पादनांचा हंगाम सुरू असल्याने बाजारात बऱ्याच प्रकारचे कायद्यात समाविष्ट नसलेले कृषी निविष्ठा उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी असे बनावट व कायद्यात न बसणाऱ्या पी.जी.आर. (तत्सम संजीवके) खरेदी करू नयेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी हेमंत काळे व मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे यांनी केले आहे.शक्यतो कायद्यात समाविष्ट नसलेल्या उत्पादनांचा जसे की, पी.जी.आर. व तत्सम संजीवके यांचा वापर करू नये. आवश्यकतेप्रमाणे वापर करावयाचा असल्यास, अशी उत्पादने खरेदी करताना कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून बिलाची मागणी करून खरेदी करावी. तसेच सर्व कीटकनाशके निरीक्षकांना अशा उत्पादनांचे पी.जी.आर. व तत्सम संजीवके व बायोलॉजिकल नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना कृषी विकास अधिकारी हेमंत काळे यांनी दिलेल्या आहेत. उत्पादनांमध्ये दोष आढळल्यास कायद्यानुसार अशा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर व उत्पादकांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठ उत्पादक व विक्रेत्यांना हेमंत काळे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
बनावट संजीवके खरेदी करण्याचे टाळा
By admin | Updated: November 16, 2015 22:19 IST