वणी : विद्या, संस्कृती व अध्यात्म यांचा संगम दर्शवित आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर किसनलाल बोरा इंग्लिश मीडिअमच्या ४५० विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत शहरातील विविध मार्गांवरून शोभायात्रा काढून धार्मिक वातावरणाची निर्मिती केली. श्ािंपी गल्ली, तेली गल्ली, शिवनेरी चौक, देशमुख गल्ली, शिवाजीरोडमार्गे जगदंबा देवी मंदिर चौकात या दिंडीची सांगता करण्यात आली. या दिंडीचे ठिकठिकाणी भक्तिपूर्ण वातावरणात पूजन करण्यात आले. शहरातील प्रमुख चौकात विद्यार्थीवर्गाने धार्मिक नृत्य केले. शिस्तबद्ध आयोजनामुळे वणीत पंढरी अवतरल्याचा आभास निर्माण होत होता. प्राचार्य कैलास कालापहाड, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम. साळवे, पंडित अहिरे व शिक्षक वृंद व शालेय व्यवस्थापनाने यासाठी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
वणी येथे विद्यार्थ्यांच्या दिंडीने अवतरली पंढरी
By admin | Updated: July 15, 2016 01:26 IST