शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

अवनखेड पंचायतला ग्रामस्वच्छतेचा पुरस्कार

By admin | Updated: June 29, 2017 01:21 IST

नाशिकरोड : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हिवरे बाजार ग्रामपंचायतीस जाहीर झाला असल्याची माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सन २०१६-२०१७चा विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा १० लाख रुपयांचा पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायतीस, तर द्वितीय आठ लाखांचा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायत व तृतीय सहा लाखांचा पुरस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मलांजन ग्रामपंचायतीस जाहीर झाला असल्याची माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी दिली.  राज्य शासनाकडून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तालुका, जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर ग्राम पंचायतींना पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, घर-गाव परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज संकल्पनानुसार उपलब्धी, लोकसहभाग आणि सामूहिक स्वयं पुढाकारातून नावीन्यपूर्ण उपक्रम या मुद्द्याच्या आधारे गुणांकन करून संत गाडगेबाबा स्वच्छ अभियानांतर्गत पुरस्कार दिले जातात. पुरस्कार निवडीसाठी विभागस्तरीय समितीमध्ये विभागीय आयुक्त महेश झगडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुदर्शन कालिके, सहायक अभियंता विष्णू वाघमोडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे, विभागीय उपायुक्त एन. पी. मित्रगोत्री, सुकदेव बनकर, सहायक आयुक्त संदीप माळोदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत व माहिती घेऊन पुरस्कारार्थी ग्रामपंचायतीची निवड केली आहे. पुरस्कारार्थी ग्रामपंचायतसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१६-१७ प्रथम पुरस्कार (१० लाख) - अहमदनगर जिल्हा हिवरे बाजार ग्रामपंचायत, द्वितीय (८ लाख) - दिंडोरी तालुका अवनखेड ग्रामपंचायत, तृतीय (६ लाख) - धुळे जिल्ह्णातील साक्री तालुका मलांजन ग्रामपंचायत यांना घोषित करण्यात आला आहे. विशेष पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागातून तीन ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पाणी गुणवत्ता- पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापनबद्दल स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार (३० हजार)- माळेगाव ग्रामपंचायत, ता. सिन्नर, जि. नाशिक , सामाजिक एकता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (३० हजार)- पुरुषोत्तम नगर ग्रामपंचायत, ता. शहादा, जि. नंदुरबार, कुटुंब कल्याण- स्व. बाबासाहेब खेडकर पुरस्कार (३० हजार)- लोणी ग्रामपंचायत, ता. राहता, जि. अहमदनगर यांना जाहीर करण्यात आला आहे. विशेष पुरस्कारप्राप्त तीन ग्रामपंचायतींपैकी प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय समितीमार्फत तपासणी होऊन राज्य स्तरावरून अंतिम प्रथम तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार असल्याची माहिती झगडे यांनी दिली.