शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

शहरातील १४ अभ्यासिकांमध्ये अंधांसाठी ‘आॅडिओ लायब्ररी’ महापालिकेचा उपक्रम : तीन टक्के राखीव निधीतून खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:31 AM

नाशिक : महापालिकेने दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या निधीतून अंध बांधवांकरिता शहरातील १४ अभ्यासिका-वाचनालयांमध्ये आॅडिओ लायब्ररी उपलब्ध करून दिल्या.

ठळक मुद्देशहरातील अंध बांधवांना आॅडिओ लायब्ररी उपलब्ध करून देण्याचा निर्णय या उपक्रमांतर्गत अभ्यासिकांना एक सीडी प्लेअर, हेडफोन उपलब्ध

नाशिक : महापालिकेने दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या निधीतून अंध बांधवांकरिता शहरातील १४ अभ्यासिका-वाचनालयांमध्ये आॅडिओ लायब्ररी उपलब्ध करून दिल्या असून, इतरही अभ्यासिका-वाचनालयांना मागणीनुसार आॅडिओ लायब्ररी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.महापालिकेमार्फत अपंगांसाठी राखीव ३ टक्के निधीतून दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मागील वर्षी, अभिषेक कृष्ण यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा एक कृती आराखडाच तयार केला होता. त्यानुसार, अनेक कामे हाती घेण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील अंध बांधवांना आॅडिओ लायब्ररी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. सदर प्रकल्पाचे काम मनपाच्या विद्युत विभागाकडे सोपविण्यात आले होते. त्यानुसार, महापालिकेमार्फत सद्य:स्थितीत शहरातील १४ अभ्यासिका-वाचनालयांमध्ये आॅडिओ लायब्ररी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत अभ्यासिकांना एक सीडी प्लेअर, हेडफोन उपलब्ध करून दिला असून, नॅबच्या सहकार्याने अंध बांधवांसाठी उपयुक्त अशा २०० सीडीजही त्याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. या उपक्रमासाठी महापालिकेने प्रत्येक ठिकाणी ३० हजार रुपये खर्च केला आहे. संबंधित अभ्यासिकांमधील कर्मचाºयांनी अंध बांधवांना त्यांच्या मागणीनुसार सदर सुविधा उपलब्ध करून द्यायची असून, तसे प्रतिज्ञापत्र संबंधितांकडून महापालिकेने लिहून घेतले आहे. सद्य:स्थितीत शहरातील १४ अभ्यासिकांमध्ये सदर आॅडिओ लायब्ररी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ज्या अभ्यासिका अथवा वाचनालये मागणी करतील, त्यांनाही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता वनमाळी यांनी दिली आहे.याठिकाणी बसविल्या आॅडिओ लायब्ररीमहापालिकेने नवीन पंडित कॉलनीतील अण्णासाहेब मुरकुटे अभ्यासिका, बाल गणेश फाउंडेशन, गंगापूररोडवरील श्रीमती माई लेले विकास विद्यालय, कृषिनगर येथील एन.एफ.बी.एम व्यवसाय केंद्र, सरस्वती लेनमधील राष्टÑमाता जिजाऊ मॉँ साहेब अभ्यासिका, नाशिक-पुणे महामार्गावरील शासकीय अंधशाळा, गंगापूररोडवरील समर्थ अभ्यासिका, नाशिकरोड देवीचौकातील नागरिक अभिनव वाचनालय, नाशिकरोड येथे महापालिकेचे सार्वजनिक वाचनालय, सातपूर येथील नॅब महाराष्टÑ युनिट, मेरीतील लोकमान्य वाचनालय, म्हसरूळ येथील सार्वजनिक वाचनालय, मखमलाबाद येथील सार्वजनिक वाचनालय आणि खुटवडनगर येथील डॉ. सुधीर फडके सार्वजनिक वाचनालयात आॅडिओ लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.