शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:39 IST

नाशिक : जिल्हा बॅँकेने थकबाकी वसुलीपोटी जप्त केलेल्या शेतकºयाच्या शेतजमिनीचा गुरुवारी लिलाव करून सुमारे एक कोटी ३१ लाख रुपये वसूल केले आहे. जिल्हा बॅँकेच्या इतिहासात ही पहिलीच घटना असून, यापुढेही थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करून बॅँकेची वसुली केली जाईल, असे बॅँक प्रशासनाने जाहीर केले आहे.

ठळक मुद्देइतिहासात पहिलीच घटना

नाशिक : जिल्हा बॅँकेने थकबाकी वसुलीपोटी जप्त केलेल्या शेतकºयाच्या शेतजमिनीचा गुरुवारी लिलाव करून सुमारे एक कोटी ३१ लाख रुपये वसूल केले आहे. जिल्हा बॅँकेच्या इतिहासात ही पहिलीच घटना असून, यापुढेही थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करून बॅँकेची वसुली केली जाईल, असे बॅँक प्रशासनाने जाहीर केले आहे.नाशिक तालुक्यातील वाडगाव-गिरणारे आदिवासी संस्थेचे सभासद खंडेराव भागूजी कातड (पाटील) व इतर चौघांकडे जिल्हा बॅँकेची मोठ्या प्रमाणावर थकबाकी झाल्याने व त्यांनी कर्जवसुलीस प्रतिसाद न दिल्यामुळे काही दिवसांपूर्वी बॅँकेने त्यांच्या जमिनीवर बोझा चढवून जप्ती केली होती. सदर जागेची किंमत ठरविण्याचा प्रस्ताव सहायक निबंधकांकडे मंजुरीसाठी पाठविंला होता. त्यांनी मंजुरी दिल्यांनतर सभासदास सात दिवसांत कर्ज भरण्याची अंतिम मुदत नोटीस देण्यात आली होती. मात्र सभासदाने थकबाकी कर्जाची रक्कम न भरल्यामुळे सदर सभासदाची नाईकवाडी शिवारातील शेतजमिनी लिलावाची जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार थकबाकीदार खंडेराव भागूजी कातड यांचे नाईकवाडी येथील ३ हेक्टर ५६ आर जमिनीचा लिलाव प्रक्रिया गुरुवारी सकाळी ११.३० वाजता सुरू करण्यात आली. याप्रक्रियेत थकबाकीदार सभासद खंडेराव भागूजी कातड हे व इच्छुक खरेदीदार संदीप थेटे, बाळासाहेब पाटील व संतोष पाटील हे सहभागी झाले.या लिलावात संदीप थेटे यांनी १ कोटी ३० लाखांपर्यंत किमत लावली, तर बाळासाहेब पाटील यांनी एक कोटी २६ लाख ५० लाखांपर्यंत किंमत लावली व संतोष पाटील यांनी एक कोटी ३१ लाख रुपये बोली बोलली त्यानुसार सर्वाधिक बोली देणाºया संतोष पाटील यांनी रोख दोन लाख ५० हजार भरणा केला तसेच व सेंट्रल बँक आॅफ इंडियाचा १९ लाख ६५ हजार रुपयांचा धनादेश बँकेच्या गिरणारे शाखेत जमा करून उर्वरित रक्कम ३० दिवसांच्या आत भरणा करण्याचे मान्य केले.आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी धडक वसुली मोहीम अशीच सुरू राहणार असून, त्यानुसार नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री येथील २८ थकबाकीदारांच्या सुमारे ४० एकर क्षेत्राचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. तसेच शीलापूर येथील माधव रामचंद्र कहांडळ यांच्याकडे दोन लाख ६६ हजारांची थकबाकी आहे. १९९७ पासून थकबाकीदार असलेले कहांडळ यांच्या ५ एकर ११ गुंठे जागेचा जाहीर लिलाव केला जाणार आहे. त्यांना सात दिवसांची नोटीस बजावण्यात आली असून, त्यानंतर थकबाकीदारांनी थकीत रक्कम न भरल्यास त्यांच्या जमिनींचा कायदेशीर मार्गाने लिलाव केला जाणार असल्याचे बॅँकेच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. यावेळी बँकेच्या वतीने शेती कर्जे वसुली विभागाचे व्यवस्थापक विलास बोरस्ते, प्रभाकर ढगे, शेलेश पिंगळे, नाशिक विभागीय अधिकारी धनवटे, भास्कर बोराडे, वसुली अधिकारे खुरकुटे उपस्थित होते.(फोटो ११ आरवर बॅँक)आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी धडक वसुली मोहीम अशीच सुरू राहणार असून, त्यानुसार नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री येथील २८ थकबाकीदारांच्या सुमारे ४० एकर क्षेत्राचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.