शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्षपदी अतुल पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:46 IST

कळवण नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या महाविकास आघाडीचे नगरसेवक अतुल पगार यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक अतुल पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र निर्धारित वेळेत दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

ठळक मुद्देकळवण नगरपंचायत : बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष

कळवण : नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या महाविकास आघाडीचे नगरसेवक अतुल पगार यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक अतुल पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र निर्धारित वेळेत दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.विद्यमान उपनगराध्यक्ष जयेश पगार यांनी राजीनामा दिल्याने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होऊन शासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात येऊन घोषणा करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे अतुल पगार यांचे एकमेव नामनिर्देशन दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बी. ए. कापसे यांनी केली. यावेळी मुख्याधिकारी सचिन माने उपस्थित होते. निवडीबाबत घोषणा होताच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. उपनगराध्यक्ष निवडीप्रसंगी नगराध्यक्ष रोहिणी महाले, गटनेते कौतिक पगार, मावळते उपनगराध्यक्ष जयेश पगार, बाळासाहेब जाधव, सुनीता पगार, अनिता जैन, रंजना जगताप, अनुराधा पगार, रंजना पगार, अनिता महाजन, भाजपचे नगरसेवक दिलीप मोरे, साहेबराव पगार, योगेश पगार व मुरलीधर अमृतकार उपस्थित होते.या निवडीप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, अरु ण पगार, जितेंद्र पगार, गौरव पगार, राजेंद्र पगार, आबासाहेब पगार, साहेबराव पगार, अविनाश पगार, मनोज पगार, प्रशांत पगार, मोयोद्दीन शेख, अनिल पगार, संजय पगार, किरण पगार, तेजस पगार, दादा निकम आदींसह तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप व शिवसेनेचे सदस्य आम्ही एकसंघ असून, आमची महाविकास आघाडी साडेचार वर्षांपासून आहे. कळवण शहराच्या विकासासाठी पक्षभेद विसरून मिळालेल्या संधीचे सोने करून जनतेला मूलभूत सुविधा मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार व सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करून शहर विकासासाठी प्रयत्नशील राहील.- अतुल पगार, उपनगराध्यक्ष, कळवण नगरपंचायत.

टॅग्स :Politicsराजकारण