शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संघ परिवाराच्या शिस्तबद्ध संचलनाने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:12 IST

विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या विविध गटांच्या वतीने शहरासह विविध उपनगरीय भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने संचलन करण्यात आले.

नाशिक : विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या विविध गटांच्या वतीने शहरासह विविध उपनगरीय भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने संचलन करण्यात आले. खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट, डोक्यावर काळी टोपी अन् खांद्यावर काठी अशा पोशाखात संघाच्या स्वयंसेवकांनी शहरातील विविध भागांमधून संचलन करत नागरिकांचे लक्ष वेधले. गंगापूररोडवरील जेहान सर्कलवरील रामनगर येथून भोसला गटाच्या वतीने संचलनाला सकाळी सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र नेहेते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत ध्वज उभारणी करण्यात आली. यावेळी शहराचे संघचालक विजय कदम, गटप्रमुख राजेश जाधव, डॉ. विनायक गोविलकर, संजय चंद्रात्रे, अतुल देशपांडे, रवि बेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. संचलन, सावरकरनगर या भागातून मार्गस्थ होत पुन्हा जेहान सर्कल येथे समारोप करण्यात आला. यावेळी नेहेते यांनी डॉ. हेडगेवार यांनी ओळखलेली शिस्त व देशाचे संघटन या दोन महत्त्वाच्या बाबींवर मनोगतातून प्रकाश टाकला.  सहभागी स्वयंसेवकांकडून वाद्यवादन केले जात होते. पंचवटी गटाच्या वतीने गोदाकाठापासून संचलनाला सुरुवात करण्यात आली. आडगाव-म्हसरूळ गटाच्या वतीने ओमनगर परिसरात संचलन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. सुमारे चारशे स्वयंसेवक यामध्ये सहभागी झाले होते. संचलनाच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भगवा ध्वज फडकावत पुष्पवृष्टी करून ‘भारत माता की जय’ घोषणा देऊन संचलनाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ब्रिजमोहन चौधरी, नाना साळुंके, गटप्रमुख मनोज पटेल, संतोष मोरे आदी उपस्थित होते.सिडको भागात संचलनाच्या प्रारंभी मुंबईतील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रमुख पाहुणे शाळिग्राम भोळे व विभाग कार्यवाह संजय कुलकर्णी यांना स्वागत प्रणाम देण्यात आला. पवननगर परिसरात संचलन झाले. विशेष आकर्षण असलेल्या संघाच्या घोषाचे नेतृत्व सुनील पाटील यांनी केले. अश्वारूढ पवन पुराणिक यांनी भगवा ध्वज घेत संचलनाचे निरीक्षण केले. दरम्यान, ठिकठिकाणी संचलनाचे स्वागत करण्यात आले. बाल स्वयंसेवकांनीही संचलनात सहभाग घेतला.