शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

येवला तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडतीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:57 IST

येवला : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत येत्या २८ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे गावोगावच्या विजयी उमेदवारांचे, नेत्यांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून आहे. येवला तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देगावस्तरावर चर्चेला उधाण : पॅनलप्रमुखांची व्यूहरचना

येवला : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत येत्या २८ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे गावोगावच्या विजयी उमेदवारांचे, नेत्यांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून आहे. येवला तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे.सदर आरक्षण सोडत काढताना प्रवर्गनिहाय ग्रामपंचायतींचे आरक्षित करण्यात येणार असून, आरक्षण काढताना केवळ बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींबाबतच आरक्षण निश्‍चित करण्यात येणार आहे. पूर्णत: अनुसूचित क्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायतींचा यात समावेश नसणार आहे. येवला तालुक्यात एकूण ८९ ग्रामपंचायती असून अनुसूचित जातीसाठी सरपंचपद आरक्षण संख्या ७, अनुसूचित जमातीसाठी १४, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २४ व सर्वसाधारण ४८ असे आरक्षण असणार आहे. सोडतीच्या दिवशी कोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी वा महिलेसाठी राखीव होते, हे कळणार आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांसह नेतेमंडळींचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.या तालुक्यांकडे लक्षयेवला तालुक्यातील नगरसूल, अंदरसूल, मुखेड, पाटोदा या प्रमुख ग्रामपंचायतींसह सावरगाव, अंगणगाव, राजापूर, जळगाव नेऊर या ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण काय निघते, याबाबत गावपातळीवर अंदाज बांधले जात असून, याठिकाणी राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक