शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

दुरंगी लढतीकडे भगूरवासीयांचे लक्ष

By admin | Updated: November 16, 2016 23:21 IST

दुरंगी लढतीकडे भगूरवासीयांचे लक्ष

 भगूर : येथील प्रभाग क्र. ६ अ हा ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. या प्रभागात भाजपाला उमेदवार मिळाला नसल्याने येथे दुरंगी लढत होत आहे. अति उच्चशिक्षित आणि सामान्य शिक्षित अशा दोन माहिलांमध्ये लढत आहे. जातीय समीकरण आणि पतिराजाच्या समाजसेवेवर विजयाचे गणित चालणार आहे.प्रभाग ६ अ मध्ये राममंदिर रोड, जैनभवन, बलकवडे पतसंस्था, यादव यांच्या घरापासून नाल्यापर्यंतचा परिसर येतो. या प्रभागाची मतदार संख्या १३०७ एवढी असून, येथे तेली, मराठा, माळी, शिंपी, वंजारी, तर काही प्रमाणात मुस्लीम समाजाचेही मतदार आहेत. येथून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे प्रेरणा विशाल बलकवडे आणि शिवसेनेकडून मनीषा कस्तुरे नशीब आजमावत आहेत. भाजपाला येथे उमेदवार मिळाला नाही. आघाडीच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांनी लंडन येथील युनिर्व्हसिटीमधून बी. ई. कॉम्प्युटर इंजिनिअरची पदवी प्राप्त केली आहे. त्या गावातील सर्वात उच्चशिक्षित आहे असे मानले जात आहे. सध्या त्या राईस मिल व प्रिवील्ड व्होअर सोल्यूशन कंपनीच्या उद्योजक आहेत. त्या नाशिक जिल्हा राष्ट्रवादी महिला युवतीच्या जिल्हाप्रमुख असून त्यांंनी अनेक आंदोलने, समाजसेवेची कामे केलेली असून, त्यांचे पती विशाल बलकवडे आंतर राष्ट्रीय कुस्तीप्रेमी, समाजसेवक आहेत. प्रेरणा बलकवडे यांना वडिलांकडूनच राजकारणाचा वारसा मिळाला आहे. त्दुसऱ्या उमेदवार मनीषा अंबादास कस्तुरे या गृहिणी असून, यांचेही शिक्षण बऱ्यापैकी झालेले आहे. तसा त्यांना स्वत:चा राजकीय वारसा नाही. परंतु मनमिळावू, सर्वांना सहकार्य करणाऱ्या म्हणून त्यांची प्रभागात ओळख आहे. त्यांचा राजकीय वारसा म्हणजे त्यांचे पती अंबादास कस्तुरे हे भगूर शिवसेनेचे शहराध्यक्ष असून, विद्यमान नगरसेवकही आहेत. राजकारणात त्यांचा चांगला दबदबा आहे. (वार्ताहर)