शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न हास्यास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:10 IST

सिन्नर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत रस्त्यांची कामे बजेटमध्ये ज्यावर्षी मंजूर केली, त्या वर्षभरात पूर्ण करणे आवश्यक असते. त्यामुळे ...

सिन्नर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत रस्त्यांची कामे बजेटमध्ये ज्यावर्षी मंजूर केली, त्या वर्षभरात पूर्ण करणे आवश्यक असते. त्यामुळे विरोधक जुने मंजुरीचे पत्र दाखवून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा करीत असलेला खटाटोप हास्यास्पद असल्याचा टोला आमदार माणिकराव कोकाटे यांनी लगावला.

कोकाटे यांच्या प्रयत्नातून महत्त्वाच्या ९ रस्त्यांसाठी सुमारे ११ कोटींचा निधी प्राप्त झाला. या कामांचा शुभारंभ कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर दोडी येथे आमदार कोकाटे बोलत होते. त्यानंतर दुपारी कोकाटे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या हस्ते सिन्नर प्रशासकीय इमारत फर्निचर व इतर कामे, डॉक्टर संघटना हॉलच्या आनुषंगिक कामे या कामांसह सिन्नर शहरातील विविध रस्त्यांची कामे, गटारकामे, डांबरीकरण यांच्यासह सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. शनिवारी दिवसभरात सुमारे १५ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन पार पडले. यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव शेळके, उपसभापती संजय खैरनार, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, शशिकांत गाडे, सुनील नाईक, सुदाम बोडके, पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख, नगरपालिकेचे गटनेते नामदेव लोंढे, शीतल कानडी, चंद्रकांत वरंदळ, बापू गोजरे, मल्लू पाबळे, रामभाऊ लोणारे, सुहास गोजरे यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळी- ११ कोकाटे

110721\11nsk_20_11072021_13.jpg

विकासकामे