शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शहा वीज केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:15 IST

सिन्नर, कोपरगाव तालुक्याची वीज समस्या दूर होणार सिन्नर : सिन्नर व कोपरगाव ची वीज समस्या दूर करण्यासाठी शहा येथील ...

सिन्नर, कोपरगाव तालुक्याची वीज समस्या दूर होणार

सिन्नर : सिन्नर व कोपरगाव ची वीज समस्या दूर करण्यासाठी शहा येथील १३२ केव्ही वीज केंद्राच्या कामाला गती द्या, सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासह कोपरगाव च्या पश्चिम पट्ट्यातील वीज प्रश्नावर महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शहा वीज केंद्रातच्या कामाला गती देऊन तीन ते चार महिन्यात हे काम पूर्ण करा, अशा सूचना वीज वितरण अधिकाऱ्यांना दिल्या.

शहा येथील प्रगतिपथावर असलेल्या १३२ केव्ही वीज केंद्राच्या कामाची आमदार माणिकराव कोकाटे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी संयुक्तरीत्या पाहणी करत कामाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना कोकाटे म्हणाले, या भागात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा जाणवतो प्रत्यक्षात आठ तास लोड शेडींग असताना नेहमी कमी दाबाने आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना चार ते पाच तास देखील पुरेशी वीज मिळत नाही. त्यामुळे माजी आमदार अशोकराव काळे आणि मी दोघांनी मिळून कोळपेवाडी येथे १३२ के व्ही वीज केंद्र मंजूर करून आणले मात्र भाजपच्या सत्ताकाळात हे काम सुरू झाले नाही. त्यानंतर शहा येथे सदर १३२ के व्ही वीज केंद्राची उभारणी करण्याचे ठरले. प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील झाली. सद्या या वीजकेंद्रा चे काम अत्यंत वेगाने सुरू असून विजेच्या टॉवर उभारणीसाठी येत असलेल्या अडचणींबाबत शेतकर्‍यांशी चर्चा करून लवकरच तोडगा काढण्यात येईल. कामाबाबत अधिकार्‍यांशी चर्चा झाली असून येत्या तीन ते चार महिन्यात वीज केंद्राचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे या केंद्राअंतर्गत सिन्नर तालुक्यातील चार वीज उपकेंद्र आणि कोपरगाव तालुक्यातील चार विज उपकेंद्रांची जोडणी करण्यात येणार असून दोन्ही तालुक्यातील वीज प्रश्न मार्गी लागणार आहे.

------------------

सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के व्ही वीज केंद्राच्या कामाची पाहणी करतांना आमदार माणिकराव कोकाटे, आमदार आशुतोष काळे, वीज वितरणचे अधिकारी व शेतकरी. (२० सिन्नर मिटींग)