शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बांधवांना शासकीय अनुदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:18 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीत गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण प्रकरणात आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाने अनुसूचित जमाती ...

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीत गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण प्रकरणात आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाने अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख आमदार दौलत दरोडा यांची भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली. याप्रकरणी आमदार दरोडा यांनी आपण प्रत्यक्ष लक्ष घालून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. अनुसूचित जमाती कल्याण समिती नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असून, आदिवासी समाजाचे नेते तुकाराम मेंगाळ व माजी उपसरपंच बस्तीराम आगिवले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदार दौलत दरोडा यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले. नांदूरशिंगोटे येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच व अन्य पदाधिकारी यांनी जाणूनबुजून आपल्या पदाचा दुरूपयोग करत खोटी व बनावट माहिती प्रशासनास सादर केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित ग्रामसेवक, सरपंच व इतर पदाधिकारी यांच्यावरती आठ दिवसांच्या आत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आजतागायत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. या फसवणुकीच्या प्रकरणातील ग्रामसेवक, सरपंच व इतर पदाधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून यांची पदे बरखास्त करण्यात यावी व सर्व आदिवासी समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सह्याद्री मंडळाचे तालुकाध्यक्ष अजय कडाळे, संघर्ष ग्रुपचे संदीप शेळके, गंगाराम मेंगाळ, निवृत्ती डोके, मनोहर आगिवले, राजेंद्र पथवे, शिवाजी आगिवले, भास्कर मेंगाळ, रामनाथ गिऱ्हे, भीमा गिऱ्हे, पांडुरंग आगिवले, कुंडलिक मेंगाळ आदिवासी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

--------

अहवालाची प्रक्रिया पूर्ण

जाणीवपूर्वक आदिवासी बांधव व इतर नागरिकांना शासकीय अनुदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयाकडील प्रोसिडिंगवरील विषय क्र. ९ ठराव क्र. ८२ मधील खोटी व बनावट माहिती वरिष्ठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्या संदर्भात जिवंत लोक मृत दाखविले आहेत, ज्या व्यक्ती कायमस्वरूपी स्थानिक रहिवासी आहेत, त्यांना स्थलांतरित दाखविले व ज्या व्यक्ती भूमिहीन किंवा अल्पभूधारक आहेत, त्यांच्या नावे अधिक क्षेत्र दाखविण्यात आले असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी निवेदनात केला आहे. याबाबत पंचायत समिती स्तरावरून चौकशी करून त्यांचे जबाबही प्रशासनास प्राप्त झाले आहेत. संपूर्ण अहवालाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

(२३ निवेदन) आमदार दौलत दरोडा यांना मागण्यांचे निवेदन देताना तुकाराम मेंगाळ, बस्तीराम आगिवले आदी.

230821\130723nsk_22_23082021_13.jpg

आमदार दौलत दरोडा यांना मागण्यांचे निवेदन देतांना तुकाराम मेंगाळ, बस्तीराम आगिवले आदी.