शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

By admin | Updated: April 18, 2016 22:47 IST

बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

 घोटी : येथील बाजारपेठेतील बँक आॅफ इंडियाचे कंत्राटी पद्धतीने चालविले जात असलेले एटीएम मशीन फोडून पैसे लंपास करण्याचा अज्ञात चोरट्याचा प्रयत्न फसला. दरम्यान, या मशीनमधील रक्कम सुरक्षित असल्याची माहिती पोलीस हवालदार नवनाथ पवार यांनी दिली. दरम्यान, बँकेने एटीएम मशीन आणि बँकेच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी दिल्या आहेत.घोटी शहरात जुन्या महामार्गावर बाजारपेठेत असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या घोटी शाखेच्या समोर कंत्राटी पद्धतीनुसार एटीएम केंद्र आहे. त्यालगत एका खासगी बँकेचे एटीएम आहे. रविवारी (दि. १७) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या एटीएमवर पाळत ठेवून बँक आॅफ इंडियाच्या एटीएमचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि यंत्रणेची तोडफोड करून आत प्रवेश केला. यावेळी लोखंडी शटर तोडण्यात आले. मात्र त्यांचा एटीएम मशीन फोडण्याचा व एटीएममधील रक्कम लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दोन दिवसाच्या सुट्यांनंतर आज सकाळी ही बाब निदर्शनास आली.या घडलेल्या प्रकाराची फिर्याद मिलिंद काशीनाथ नेह (रा. नाशिकरोड) यांनी घोटी पोलीस स्थानकात दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवनाथ पवार करीत आहे.दरम्यान, गेल्या वर्षी याच एटीएमशेजारी असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेचे कंत्राटी एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून लाखो रु पये चोरून नेले होते. त्याबाबतचा तपास अद्यापही लागलेला नाही. तसेच या मार्गावर अनेक नामांकित बँका व एटीएम आहेत. तेथे सुरक्षारक्षक तैनात असतात. (वार्ताहर)