शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:13 IST

नाशिक : जिल्ह्णात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन शांततेत आणि कायदेशीर मार्गाने सुरू आहे. परंतु, जिल्हा प्रशासन आंदोलनाला परवानगी नाकारून मोर्चा समन्वयकांना नोटिसांवर नोटिसा पाठवत आहेत. मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनच आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (दि. २६) पत्रकार परिषदत केला आहे.

ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चाचा आरोप : यापुढे महिलांच्या नेतृत्वात गनिमी काव्याने लढा

नाशिक : जिल्ह्णात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन शांततेत आणि कायदेशीर मार्गाने सुरू आहे. परंतु, जिल्हा प्रशासन आंदोलनाला परवानगी नाकारून मोर्चा समन्वयकांना नोटिसांवर नोटिसा पाठवत आहेत. मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनच आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (दि. २६) पत्रकार परिषदत केला आहे.मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारपासून पुकारलेल्या बेमुदत उपोषणाला जिल्हा प्रशासन, पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे आंदोलकांनी जिल्हा सत्र न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आवारात आंदोलनास सुरुवात केली.परंतु येथेही केवळ दुपारी २ वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी दिली. परंतु आंदोलक ठिय्या आंदोलनावर ठाम राहिल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिक शहर, नाशिकरोड परिसर आणि उपनगरांमध्ये बुधवारी (दि. २५) आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटल्याने गुरुवारी ठिय्या आंदोलनासाठी आंदोलकांपेक्षा अधिक संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे आंदोलकांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा प्रशासन आणि सरकारचा निषेध करीत यापुढे गनिमी काव्याने आंदोलन करण्याची माहिती दिली. तसेच यापुढील आंदोलनाचे नेतृत्व मराठा क्रांती मोर्चाच्या महिला समन्वयक करणार असल्याची माहिती दिली आहे.यावेळी करण गायकर, तुषार जगताप, मधुकर कासार, राजू देसले, उमेश शिंदे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, अस्मिता देशमाने आदी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सानप यांच्या निवासस्थानी उद्या आंदोलन मराठा क्रांती मोर्चाला आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे यापुढे शहरातील आमदारांच्या घरासमोर आंदोलन कण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. या आंदोलनात सर्वप्रथम सत्ताधारी पक्षाचे आमदार तथा शहराध्यक्ष असलेले आमदार बाळासाहेब सानप यांच्या घरासमोर शनिवारी (दि. २८) आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा समन्वयकांनी दिली आहे. आंदोलकांची गळचेपीमराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना परवानगी नाकारून जिल्हा प्रशासन आणि सरकार आंदोलकांची गळचेपी करीत असल्याचा आरोप मोर्चा समन्वयकांनी के ला आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात येणाऱ्या आंदोलनाची जागा नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाची आहे. त्यामुळे या ठिकाणी परवानगी नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नसतानाही जिल्हा प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारून आंदोलकांना उकसवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला आहे.