शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पिळकोस ग्रामपंचायतीचा गैरकारभार दडपण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:45 IST

कळवण तालुक्यातील पिळकोस ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकासकामांत ग्रामसेवकाने सरपंचाला हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर गैरकारभार केल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत चौकशी सुरू करण्यात आली असून, ग्रामसेवकाला नोटीसही बजावण्यात आली आहे.

नाशिक : कळवण तालुक्यातील पिळकोस ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकासकामांत ग्रामसेवकाने सरपंचाला हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर गैरकारभार केल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत चौकशी सुरू करण्यात आली असून, ग्रामसेवकाला नोटीसही बजावण्यात आली आहे.  गेल्या पाच महिन्यांपासून यासंदर्भात मकरंद वाघ यांनी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्याने त्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी गटविकास अधिकाºयांना चौकशीचे आदेश दिले आहेत. वाघ यांनी आपलं सरकार या पोर्टलवर तक्रार केली असता, प्रारंभी अधिकाºयांनी संगनमत करून सदर तक्रार निकाली काढली होती, परंतु माहिती अधिकार कायद्याचा वापर तसेच ग्रामपंचायतीच्या कारभाराची कागदपत्रे गोळा केल्यानंतर अलीकडेच ग्रामपंचायतीने केलेल्या विविध कामांची चौकशी करण्यात आली.  ग्रामपंचायतीने पाण्याची सीमेंटची टाकी बांधण्याऐवजी प्लॅस्टिकची टाकी बसवून तिला चौहोबाजूंनी सीमेंट, विटा उभ्या करून सीमेंटची टाकी बांधल्याचे भासवून पैशांचा अपहार केला, त्याचबरोबर दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत रस्ता कॉँक्रीटीकरणाच्या कामातही ग्रामसेवक आर. एस. जाधव याने रकमेचा अपहार केला तसेच तंटामुक्ती योजनेच्या कामांमध्येही अनियमितता केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.ग्रामसेवकाने स्मशानभूमी बांधकाम करताना जागेची निवड व्यवस्थित न केल्याने पाण्याच्या प्रवाहात बांधकाम वाहून गेले असून, जे काही बांधकाम केले त्यालाही तडे गेल्याने सदरचे काम निकृष्ट झाल्याचा निष्कर्ष शाखा अभियंत्यांनी काढला आहे. ग्रामपंचायतींच्या कामांमध्ये झालेली अनियमितता व रकमेचा अपहार पाहता सदरचा खर्च ग्रामसेवक व सरपंचांकडून वसूल करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. इतक्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असतानाही ग्रामसेवकाला पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप मकरंद वाघ यांनी केला आहे.