शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत बस जाळण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 2, 2016 23:38 IST

आंदोलन : समीर भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद

इगतपुरी : राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अटकेचे इगतपुरी शहरात तीव्र पडसाद उमटले. अज्ञात इसमांनी महामंडळाच्या बसला लक्ष्य करून तिची तोडफोड करून ज्वलनशील रसायनाने बस जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . इगतपुरी शहरातील जुना मुंबई- आग्रा महामार्गावर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास इगतपुरी डेपोची बस (एमएच १५ ईएफ ६८०२) कसाऱ्याहून प्रवाशांना घेऊन इगतपुरीकडे येत होती. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या बॉम्बे जनरल स्टोअर्ससमोर बसचा वेग कमी झाला असता तोंडावर रुमाल बांधून आलेल्या दोन जणानी बसवर अचानक लाकडी दांडे घेऊन हल्ला केला. यामुळे बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. बसच्या एका बाजूच्या सर्व खिडक्याच्या काचांवर लाकडी दांड्याने वार करीत वाहकाच्या समोरील काचदेखील फोडण्यात आली. दरम्यान, तोडफोड करत असताना एकाने ज्वलनशील रसायनाने बसच्या पुढील टायरवर टाकून बस जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात टायर जळताना पाहून नागरिकांनी आरडओरड सुरू केली. यामुळे या अज्ञात दोघानी पळ काढला. स्थानिक नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी घरातील पाणी आणून आग विझवली. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनचालक शिवनाथ खडके यांनी फिर्याद दिली आहे. बसचे ५० हजार रु पयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक एच. पी. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)