घोटी : इगतपुरी तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असणाऱ्या घोटी शहरात गुरुवारी मध्यरात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास एकाच ठिकाणी असलेल्या ४ दुकानांचे शटर वाकवून धाडसी चोरीचा प्रयत्न केला. मात्र तीन दुकानांत चोरट्यांच्या हाती काहीच न लागल्याने चौथ्या दुकानातून चार हजार रुपये घेऊन फरार होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. यात अन्य दोन जण पसार झाले. या प्रकाराने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घोटी येथे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी विजयराज मार्केटमधील परी कलेक्शन, राजे जेन्ट्स शॉपी, ब्रँड हाऊस आणि फॅशन हब मोरया या दुकानांमध्ये शटर तोडून प्रवेश केला. त्याच सुमारास पोलीस कर्मचारी बस्ते व केदारे हे मोटारसायकलवर या भागातून गस्त घालत असताना सदर दुकानांजवळ त्यांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांनी तत्काळ त्या दिशेने धाव घेत संशयित ऋषिकेश अशोक राजगिरे (रा. चिंचोळे, अंबड, नाशिक) यास ताब्यात घेतले. संशयिताचे इतर दोन साथीदार युवराज व नाना (पूर्ण नाव माहीत नाही, रा. घोटी) हे पळून जाण्यात यशस्वी झाल्याची चर्चा आहे.याप्रकरणी घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पारधी, शीतल गायकवाड, केदारे, बस्ते आदी करीत आहेत.
घोटीत चार दुकानांचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 01:20 IST
इगतपुरी तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असणाऱ्या घोटी शहरात गुरुवारी मध्यरात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास एकाच ठिकाणी असलेल्या ४ दुकानांचे शटर वाकवून धाडसी चोरीचा प्रयत्न केला. मात्र तीन दुकानांत चोरट्यांच्या हाती काहीच न लागल्याने चौथ्या दुकानातून चार हजार रुपये घेऊन फरार होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. यात अन्य दोन जण पसार झाले.
घोटीत चार दुकानांचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न
ठळक मुद्देएक संशयित जेरबंद : दोघे फरार