यावेळी चोरट्याने एटीएम मशीन रूमचे बाजूला वरती तसेच आतील व बाहेरील बाजूस लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यास चिखल माती लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर घटनेबाबत हिताची कंपनी एटीएमचे कामकाज बघणाऱ्या सौ. सीमावती विशाल पाटील (३७, मूळ रा. खामलोण ता. सटाणा हल्ली मु. आठंबे, ता. कळवण) यांनी अभोणा पोलीसात लेखी फिर्याद दिली आहे. घटनास्थळी साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांनी उपनिरीक्षक दीपक बागूल व चमूसह भेट देऊन पाहणी केली तर सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एन कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली श्वानपथक, ठसेतज्ञ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक बागुल करत आहेत.
इन्फो
चोरीची पद्धत सारखीच
२९जुलै २०२१ रोजी अभोण्यात वर्धमान कॉम्फ्लेक्स मधील स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरटयाकडून ज्या पद्धतीने फोडण्यात आले होते. तीच पद्धतच कनाशीच्या घटनेत समोर आली आहे. दोन महिने उलटूनही अभोणा एटीएम फोडीच्या घटनेतील अज्ञात चोरट्यास अद्यापही पकडण्यात यश आलेले नाही. त्यातच ८ सप्टेंबरच्या कनाशीतील घटनेने अभोणा पोलिसांपुढे अज्ञात चोरटयाने आव्हान उभे केले आहे.
फोटो- ०९ एटीएम मशिन
090921\09nsk_38_09092021_13.jpg
फोटो- ०९ एटीएम मशिन