सिन्नर : तालुक्यातील डुबेरे गाव व परिसरात भटक्या श्वानांचा सुळसुळाट झाला असून, पाळीव जनावरांसह लहान मुलांवर हे कुत्रे हल्ला करीत आहेत.गेल्या दोन दिवसांपूर्वी तेजस्विनी सुनील ढोली या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी श्वानांच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. परिसरात गेल्या काही दिवसांपासून २५ ते ३० भटक्या श्वानांच्या टोळ्या फिरत आहेत. लहान मुलांसह पाळीव जनावरांवर ही टोळी हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. दिवसभर आजूबाजूच्या वस्त्यांवर भटकत हे श्वान सावज शोधत असतात. सायंकाळी पाच वाजेनंतर रात्रभर हे श्वान बाजारतळाकडून ठाणगावकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर पुलानजीक रस्त्याच्या दोन्ही बाजूने अंतरा-अंतराने बसलेले असातात. एकट्याने पायी जाणाºयावर अचानक हल्ला करतात. दुचाकीस्वारांवरही ते हल्ले करु लागले आहेत.गेल्या दोन दिवसांपूर्वी गावात जात असताना तेजस्विनी ढोली या बालिकेवर या श्वानांनी हल्ला केला. त्यात तिच्या डाव्या पायाच्या पोटरीला लचका तोडून जखमी केले आहे. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतल्यानंतर कुत्र्यांच्या तावडीतून तेजस्वीनी सुटली. त्यानंतर खासगी दवाखान्यात नेऊन तिच्यावर उपचार करण्यात आले.ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.लहान मुले गावात, घरापुढे अंगणात खेळत असतात. शाळेत जाणारी-येणारी मुले रस्त्याने फिरत असतात. गावात आलेली २५ ते ३० भटक्या कुत्र्यांची टोळी अचानक त्यांच्यावर हल्ला करते. त्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. परिसरात नाशिक महापालिका क्षेत्रातून पकडून आणलेले भटके कुत्रे सोडण्यात येत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. वयोवृद्धांसह लहान मुलांवरही हे हल्ला करतात. एकटा पायी रस्त्याने चालणारा माणूस दिसला तर त्याच्यावरही हे कुत्रे धावून जातात. अनेक वेळा लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करु न जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत.
डुबेरे येथे भटक्या श्वानांकडून हल्ल्यांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 00:33 IST
सिन्नर : तालुक्यातील डुबेरे गाव व परिसरात भटक्या श्वानांचा सुळसुळाट झाला असून, पाळीव जनावरांसह लहान मुलांवर हे कुत्रे हल्ला करीत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी तेजस्विनी सुनील ढोली या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी श्वानांच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
डुबेरे येथे भटक्या श्वानांकडून हल्ल्यांचे प्रमाण वाढले
ठळक मुद्देनाशिक महापालिका क्षेत्रातून पकडून आणलेले भटके कुत्रे सोडल्याचा आरोप