शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

सटाणा तहसीलवर हल्लाबोल

By admin | Updated: September 1, 2016 23:53 IST

ग्रामस्थांचा संताप : बिलपुरी येथील विवाहिता खून प्रकरण

सटाणा : पत्नीचा लोखंडी तीक्ष्ण हत्त्याराने खून करूनही खुनी पतीच्या बचावासाठी मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी व जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी संगनमत करून मोटारसायकल अपघात दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुलीचे माहेर असलेल्या बिलपुरी ग्रामस्थांचा आहे. आरोपीला पाठीशी घालणाऱ्या या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. १) या विवाहितेचे माहेर असलेल्या बिलपुरी येथील संतप्त सातशे ते आठशे महिला-पुरु षांनी मोर्चा काढून तहसील कार्यालयावर हल्लाबोल केला.दरम्यान, येत्या ६ सप्टेंबरपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास ७ सप्टेंबर रोजी बिलपुरीचे ग्रामस्थ आपल्या मुलाबाळांसह अन्न- पाण्याचा त्याग करून गावातच उपोषण करणार असल्याचा इशारा दिला.पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला पाठीशी घालणारे पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक नखाते व जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक झालीच पाहिजे, अशा घोषणा देत शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून बिलपुरी, बोढरी, चिराई, टेंभे येथील ग्रामस्थांनी डॉ. शेषराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे सातशे ते आठशे महिला व पुरुष सहभागी झाले होते. ताहराबाद रोड या प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन हल्लाबोल केला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी घटनेचा निषेध करत सहायक पोलीस निरीक्षक होळकर यांनी मृत सविताच्या नातेवाइकांना जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला. दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर पुरावा नष्ट करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येत्या ६ सप्टेंबरपर्यंत अटक न केल्यास ७ सप्टेंबरपासून बिलपुरीचे ग्रामस्थ आपल्या कुटुंबीयांसह अन्न-पाण्याचा त्याग करून आमरण उपोषण करतील, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला. तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी मोर्चेकऱ्यांना सामोरे जात घडलेला प्रकार निंदनीय असल्याचे सांगून आपल्या भावना जिल्हाधिकारी यांच्याकडे पोहचवून आपल्याला न्याय मिळेल यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असेल, असे सांगतले. मोर्चात डॉ. शेषराव पाटील यांच्यासह बिलपुरीचे सरपंच सतीश पवार, जिल्हा परिषेदेचे माजी सदस्य विक्रम मोरे, अण्णा मोरे, साहेबराव पवार, विठ्ठल पवार, नूतन अहेर, सुनंदा पवार, जिजा पवार, इंदू पवार, यशोदा पवार, अंजना पवार, सीमा पवार, उषा पवार, रेश्मा पवार, सखूबाई पवार, उज्ज्वला पवार, सुषमा पवार, निर्मला पवार, शोभा अहिरे, वंदना अहिरे, वैशाली अहिरे, संगीता चव्हाण, ललिता शेवाळे यांच्यासह सातशे ते आठशेच्या संख्येने महिला-पुरु ष सहभागी झाले होते. बागलाण तालुक्यातील बिलपुरी येथील सविता पवार हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी गोराणे येथील अरविंद श्रावण देसले याच्याशी झाला होता. सवितापासून अरविंदला एक मुलगीही आहे. मुलगा पाहिजे म्हणून त्यांचे खटकेही उडत होते. दोघांचा तंटामुक्ती समिती व नातेवाइकांनी नऊ महिन्यांपूर्वी समझोता करून सविताला सासरी नांदायला पाठवले होते. दरम्यान, गेल्या ?? जुलै रोजी सासरच्यांनी सविताला माहेरी बिलपुरीला कार्यक्रमासाठी पाठविले होते. त्यांनतर दुसऱ्याच दिवशी रात्री ? वाजता अरविंद मोटारसायकलवर गोराण्याला जातो म्हणून घेऊन गेला. आणि पहाटे ? वाजता आसखेडा-गोराणे या रस्त्यावर अपघात झाल्याचे कळविण्यात आले होते. मात्र हा प्रकार संशयास्पद असून, सविताचा घातपात झाल्याची तक्रार करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी बिलपुरीच्या ग्रामस्थांनी केली होती. मात्र जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी हा अपघातच असल्याचे सांगून आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ग्रामस्थांनी मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी केली. मात्र त्यांनीदेखील हा अपघातच असल्याचे सांगून सहायक पोलीस निरीक्षक होळकर यांची बाजू लावून धरली. (वार्ताहर)