शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘हल्लाबोल’चा धसका; बागलाणला टॅँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:07 IST

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करणाºया बागलाणवासीयांना अखेर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी तीन टॅँकर मंजूर केले असून, रविवारपासून तहानलेल्या गावांना टॅँकर सुरू होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देयेवल्याला ठेंगा जिल्ह्यात पाणीटंचाईला सुरुवात

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करणाºया बागलाणवासीयांना अखेर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी तीन टॅँकर मंजूर केले असून, रविवारपासून तहानलेल्या गावांना टॅँकर सुरू होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात सर्वत्र पावसाळ्यात चांगला पाऊस झाला असला तरी येवला व बागलाण तालुक्यांतील काही भागांत अखेरपर्यंत पावसाने पाठशिवणीचा खेळ खेळल्यामुळे जानेवारी महिन्यांपासूनच या तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली. ग्रामपंचायतींनी ठराव करून पंचायत समितीकडे पाठविले होते. त्यानुसार तहसीलदार, गटविकास अधिकाºयांनी संबंधित गावांना भेटी देऊन टंचाई असल्याची खात्री केली होती व तसा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला.परंतु जानेवारीत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते यावर विश्वास न ठेवणाºया प्रशासनाने टॅँकर मागणीच्या प्रस्तावात त्रुटी काढून चालढकल चालविली होती.या संदर्भात स्थानिक आमदारांनीही पाठपुरावा केला तरीही प्रशासन धजावत नव्हते.राज्य सरकारच्या विरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसने उत्तर महाराष्टÑात हल्लाबोल यात्रा काढली असून, रविवारी ही यात्रा सटाणा येथे पोहोचणार आहे. यावेळी पाणीटंचाईचा सामना करणाºया ग्रामस्थांकडून सरकार व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध तक्रारी होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाई व पाण्याचा टॅँकर हा हल्लाबोल यात्रेचा मुद्दा होऊ नये म्हणून शनिवारी अखेर बागलाण तालुक्यातील खिरमाणे, चौगाव, गोराणे या तीन गावांसाठी टॅँकर मंजूर करण्यात आले आहेत. राष्टÑवादीची हल्लाबोल यात्रा शुक्रवारी येवला येथेही झाली; परंतु तेथे मात्र प्रशासनाने टॅँकर मंजूर केले नसल्याने प्रशासन पाणी टॅँकर मंजुरीत राजकारण करते काय? असा सवाल केला जात आहे.‘हल्लाबोल’चा धसका; बागलाणला टॅँकरयेवल्याला ठेंगा : जिल्ह्यात पाणीटंचाईला सुरुवातनाशिक : गेल्या दीड वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करणाºया बागलाणवासीयांना अखेर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी तीन टॅँकर मंजूर केले असून, रविवारपासून तहानलेल्या गावांना टॅँकर सुरू होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात सर्वत्र पावसाळ्यात चांगला पाऊस झाला असला तरी येवला व बागलाण तालुक्यांतील काही भागांत अखेरपर्यंत पावसाने पाठशिवणीचा खेळ खेळल्यामुळे जानेवारी महिन्यांपासूनच या तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली. ग्रामपंचायतींनी ठराव करून पंचायत समितीकडे पाठविले होते. त्यानुसार तहसीलदार, गटविकास अधिकाºयांनी संबंधित गावांना भेटी देऊन टंचाई असल्याची खात्री केली होती व तसा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला.परंतु जानेवारीत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते यावर विश्वास न ठेवणाºया प्रशासनाने टॅँकर मागणीच्या प्रस्तावात त्रुटी काढून चालढकल चालविली होती. या संदर्भात स्थानिक आमदारांनीही पाठपुरावा केला तरीही प्रशासन धजावत नव्हते.राज्य सरकारच्या विरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसने उत्तर महाराष्टÑात हल्लाबोल यात्रा काढली असून, रविवारी ही यात्रा सटाणा येथे पोहोचणार आहे. यावेळी पाणीटंचाईचा सामना करणाºया ग्रामस्थांकडून सरकार व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध तक्रारी होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाई व पाण्याचा टॅँकर हा हल्लाबोल यात्रेचा मुद्दा होऊ नये म्हणून शनिवारी अखेर बागलाण तालुक्यातील खिरमाणे, चौगाव, गोराणे या तीन गावांसाठी टॅँकर मंजूर करण्यात आले आहेत. राष्टÑवादीची हल्लाबोल यात्रा शुक्रवारी येवला येथेही झाली; परंतु तेथे मात्र प्रशासनाने टॅँकर मंजूर केले नसल्याने प्रशासन पाणी टॅँकर मंजुरीत राजकारण करते काय? असा सवाल केला जात आहे.