शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
3
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
4
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
5
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
6
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
7
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
8
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
9
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
10
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
12
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
13
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
14
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
15
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
16
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
17
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
18
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

एटीएम, बँकांच्या बाहेर रांगा

By admin | Updated: November 12, 2016 02:26 IST

नोटा बदलण्याची घाई : पोस्टातही ग्राहकांची वाढली गर्दी

नाशिक : केंद्र सरकारने घेतलेल्या १००० व ५०० रुपयांच्या जुन्या नोटांवरील बंदीच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये पसरलेली अस्वस्थता अद्यापही कायम असून शहरातील विविध बँका, पोस्ट आॅफिस, सीडीएम आणि एटीएम मशीनसमोर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी व दैनंदिन खर्चासाठी रक्कम काढण्यासाठी शुक्रवारीही लांबच लांब रांगा लावल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांना जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी शहरातील अनेक सीडीएम सेंटर कार्यान्वित करण्यात आली आहेत. सीडीएम मशीनमध्ये एकाच वेळी ४८ हजार रुपयांपर्यंतची रक्कम जमा करता येत असल्याने नागरिकांनी बँकांसह अशा सीडीएम मशीनसमोरही रांगा लावून हजार व पाचशेच्या नोटांचा भरणा केला. तर काही ठिकाणी एटीएममधून ग्राहकांना पैसे मिळाले असले तरी विविध भागातील सरकारी बँक ांच्या एटीएमसह बहुतेक एटीएम शुक्रवारीही बंद राहिले. अनेकांनी बँकांमध्ये, पोस्टात तासन्तास उभे राहून ४००० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेच्या नोटा बदलून घेतल्या. चलनातील मोठ्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर गुरुवारी बँका उघडल्यानंतर सहकारी आणि खासगी क्षेत्रातील काही बँकांकडून दुपारच्या आत १०, २०, ५०, १०० च्या नोटा संपल्याचे सांगण्यात आले. तर काही बँकांमध्ये ओळखीच्या आणि कर्मचाऱ्यांच्या नातेसंबंधातील व्यक्तींना प्राधान्याने नोटा बदलून देण्याचे प्रकार घडल्याने शुक्रवारी सकाळपासूनच नागरिकांनी सरकारी बँका आणि पोस्ट आॅफिसमध्ये गर्दी केली. सरकारने अचानक हजार व पाचशे रुपयांच्या मोठ्या जुन्या चलनी नोटा रद्द केल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नवीन मोठ्या नोटांपेक्षा १०, २०, ५०, १००च्या नोटांविषयी विश्वासार्हता वाढली असून, या नोटांना मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपवाद वगळता १०, २०, ५०, १०० च्या नोटांचा भरणा होत नसल्याचे चित्र असल्याने बँकांमध्येही १०, २०, ५०, १०० च्या चलनी नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. बँकामध्ये येणारे चलन जलदगतीने संपत असून पर्याप्त स्वरूपात नवीन चलनी नोटांचा पुरवठा वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)