शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुंडाची भेट घेतल्याने आठवले वादात

By admin | Updated: October 16, 2016 02:12 IST

पवारची विचारपूस : पोलीस पडले बुचकळ्यात

नाशिक : पोलिसांवर दगडफेक करण्याबरोबरच घरात शस्त्रास्त्रे व घातक हत्यारे बाळगल्याने कारवाईस पात्र ठरलेले भाजपाचे नगरसेवक पवन पवार याची जिल्हा रुग्णालयात जाऊन केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी घेतलेली भेट वादात सापडली असून, त्याचा परिणाम पोलीस तपासावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका केंद्रीय मंत्र्याने गुन्हेगाराच्या प्रकृतीची विचारपूस करण्याची बाबच मुळी असंवैधानिक असल्याचे मानले जात आहे. तळेगाव येथील घटनेला प्रत्युत्तर म्हणून पवन पवार व रिपाइंचे शहराध्यक्ष अर्जुन पगारे यांनी धम्मचक्र परिवर्तन दिनाचे निमित्त साधून मंगळवारी त्र्यंबकेश्वर ते नाशिक अशी दुचाकी रॅली काढली व त्यानंतर शहरात ठिकठिकाणी टोळक्यांकडून दगडफेकीच्या तसेच हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या आटोक्यात आणताना पोलिसांच्या नाकीनव आलेले असताना बुधवारी दुपारी नाशिकरोड येथे पोलिसांच्या सशस्त्र संचलनावर जेलरोड भागात दगडफेक करण्यात आली होती. ही दगडफेक करताना नगरसेवक पवन पवार याने पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली, परिणामी पोलिसांनी पवार याच्या भावासह तिघांना चोप देत ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पवार याच्या निवासस्थानी तसेच कार्यालयाची झडती घेतली असता दोन पिस्तूल, काडतुसे, जांबिया, तलवार, गोणीभर दगड, मिरचीची पूड अशी शस्त्रास्त्रे सापडली होती. काही महिन्यांपूर्वी पवन पवार याने भाजपात प्रवेश केला व त्याच्या या प्रवेशाला आमदार बाळासाहेब सानप यांचे पूर्ण समर्थन होते. त्यामुळे सानपदेखील पक्षांतर्गत वादात सापडले होते. पवार याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असताना शनिवारी नाशिकच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी जिल्हा रुग्णालयात तळेगाव घटनेतील पीडित बालिकेची भेट घेतानाच पवन पवार याचीही भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. विशेष म्हणजे आठवले यांना विशेष दर्जाची सुरक्षा असून, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाहणाऱ्या पोलिसांना घेऊनच त्यांनी पवार याची भेट घेतली. (प्रतिनिधी)