शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

अथर्व रॉयल्स चॅम्पियन

By admin | Updated: December 31, 2016 01:34 IST

लोकमत एनपीएल सीझन ६ : संदीप फाल्कन्सवर मात

नाशिक : राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल सीझन-६ च्या अंतिम सामन्यात अथर्व रॉयल्सने संदीप फाल्कन्सचा ५२ धावांनी पराभव करीत स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले असून, अथर्व रॉयल्सच्या १६५ धावांचा पाठलाग करताना अवघ्या ११३ धावांत गारद झालेल्या संदीप फाल्कन्सच्या संघाला उपविजेते पद मिळाले. अथर्व रॉयल्सची ढासळलेली फलंदाजी सावरत विजयाच्या दिशेने नेणारा मयूर वाघ सामनावीर ठरला.  संदीप फाल्कन्सचा कर्णधार मनोज परदेशीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत अथर्व रॉयल्सला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिल्यानंतर अथर्व रॉयल्सने मयूर वाघच्या वादळी शतकाच्या जोरावर संदीप फाल्कन्ससमोर विजयासाठी १६६ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग क रताना संदीप फाल्कनचा संपूर्ण संघ १७. ३ षटकांमध्ये सर्वबाद ११३ धावाच करू शकल्याने या संघाला ५२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तत्पूर्वी संदीप फाल्कन्सच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत अथर्व रॉयल्सच्या फलंदाजांना बांधून ठेवत ठरावीक अंतराने एकामागून एक धक्के दिले. स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावांचा विक्रम करणाऱ्या स्वप्नील राठोडला अमित लहामगेने १७ धावांवर त्रिफळाचित केले, तर प्रतीक भालेरावने कपिल शिरसाठलाही आठ धावांवर तंबूत धाडले. राहुल विश्वकर्मा अवघ्या ४ धावांवर तुषार इंद्रीकरचा बळी ठरला. कर्णधार वैभव केंदळेही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याला अमित लहामगेने ७ धावांवर प्रतीक भालेरावकरवी झेलबाद केले. अथर्व रॉयल्सची पडझड झाल्यामुळे हा संघ शतकी धावसंख्याही उभारू शकतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली असताना मैदानावर उतरलेल्या मयूर वाघने तुफान फ लंदाजी केली. त्याने चौफे र फटके बाजी करताना ३९ चेंडूंवर ११ वेळा चेंडू सीमापार पाठवत ६ चौकार आणि ५ षटकार टोलवत ६८ धावा फटकावल्या. त्याला सुनील पटेलने १७ चेंडूंमध्ये २ चौकार व १ षटकारासह २४ धावांचे महत्त्वाची साथ दिली. समाद अत्तरनेही अवघ्या ५ चेंडूत ३ चौकारांसह झटपट १५ धावा केल्या. त्यामुळे अथर्व रॉयल्सला संदीप फाल्कन्ससमोर विजयासाठी १६६ धावांचे आव्हान उभे करता आले. अथर्व रॉयल्सकडून सर्वाधिक धावा करणारा मयूर वाघ याची अंतिम सामन्यातील धडाकेबाज खेळी एनपीएलच्या फायनलमध्ये अविस्मरणीय बनली असून, त्याच्या खेळीच्या जोरावर अथर्व रॉयल्स संघाला २० षटकांमध्ये ७ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारता आली. संदीप फाल्कन्सकडून गोलंदाजी करताना मेहारज सय्यदने ४ षटकांमध्ये ३५ धावा देऊन २ बळी मिळवले. प्रतीक भालेरावने ४ षटकांमध्ये २८ धावा देत एक गडी बाद केला. मोहन केसीने ४ षटकांमध्ये २० धावा दिल्या. अमित लहामगेने ३ षटकांमध्ये १६ धावा देत २ बळी घेतले. रोहित भोरेने १ षटकात ९ व सागर लभडेने १ षटकात १७ धावा दिल्या. अथर्व रॉयल्सने दिलेल्या १६६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या संदीप फाल्कन्सचा सलामीवीर राहुलने ३२ धावा काढून संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याचा साथीदार मुझफ्फर सय्यतद अवघ्या १३ धावा काढून बाद झाला. सुजय महाजनने ३३ धावांचे चांगले योगदान दिले. परंतु त्याच्यानंतर १३ धावा करणारा तुषार इंद्रीकरशिवाय कोणताही फलंदात दोन अंकी धावसंघ्या करू शकला नाही. अखेरीस फ लंदाजांची फळी तळाला पोहोचल्यानंतर तुषार उंच फटका खेळून झेल बाद झाला. त्यामुळे संदीप फाल्कन्सला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करताना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. (प्रतिनिधी)