शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

फलज्योतिष हे विज्ञान नाहीच अंनिसचे मत : निवडणूक निकालात ज्योतिषशास्त्र फेल

By admin | Updated: May 26, 2014 19:21 IST

नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ८० टक्के खरी माहिती ज्योतिषांनी हमीपूर्वक द्यावी, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले होते; परंतु एकाही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नसल्याचे अंनिसने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, फलज्योतिष हे विज्ञान नसल्याचा पुनरुच्चारही अंनिसने पत्रकात केला आहे.

नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ८० टक्के खरी माहिती ज्योतिषांनी हमीपूर्वक द्यावी, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले होते; परंतु एकाही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नसल्याचे अंनिसने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, फलज्योतिष हे विज्ञान नसल्याचा पुनरुच्चारही अंनिसने पत्रकात केला आहे.अंनिसने पत्रकात म्हटले आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी अंनिसने तमाम ज्योतिष अभ्यासकांना निकालाची खरी माहिती देण्याचे आव्हान दिले होते. मात्र, कुणीही हे आव्हान स्वीकारले नाही. याशिवाय ज्या ज्योतिषांनी परस्पर स्वत:ची जी भाकीते केली ती पूर्णत: फेल गेली आहेत. ज्योतिषांकडून वेगवेगळ्या माध्यमांतून अशास्त्रीय, निरूपयोगी व दैववादी भूलथापा देत दावे केले जातात. परंतु त्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. विज्ञान ठरण्यासाठी गृहितके मांडावी लागतात. फलज्योतिषाबाबत गृहितके व त्यातील विसंगती लगेच लक्षात येते. कुंडलीतील राहू-केतू अस्तित्वात नाहीत. अमक्या ग्रहाचा तमका परिणाम हे कळण्यासाठी इतर ग्रहांचा परिणाम थांबवून तपासणे गरजेचे आहे, परंतु ते शक्य नाही. आकाशस्थ पोकळीचे बारा भाग करून त्यांना दिलेले गुणधर्म यालाही काडीचा आधार नाही. कोणती जन्मवेळ मानायची आणि तीच का मानायची याला कसलेही शास्त्रीय स्पष्टीकरण नाही. ज्योतिष ही एक कला असून माणसाला आधार आणि उज्ज्वल भवितव्य यांचे स्वप्न ही कला विकत असते. त्यामुळे ज्योतिष हे शास्त्र नसल्याचा दावाही अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे व शहर कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे यांनी पत्रकात केला आहे.