नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील यशवंत निकम यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.जायगाव (मुळगाव कोठुरे. ता. निफाड) येथे सुतारकाम करणारे यशवंत लालजी निकम (५०) हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. निकम बुधवार पासुन घरातुन कोणालाही न सांगता बेपत्ता झाले होते. घरच्या लोकांनी नातेवाईकांकडे विचारपूस सुरू केली असतांना शुक्र वारी (दि.४) दुपारी नायगाव येथील गोदावरीच्या पात्रात अज्ञात व्यक्तीचे प्रेत तरंगतांना शेतकऱ्यांना दिसले होते. याबाबत निकम यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी भेट देऊन बघितले असता यशवंत निकम हेच असल्याचे स्पष्ट झाले.एमआयडीसी पोलिसांनºया प्रकरणी अकस्मिक मुत्यूची नोंद केली आहे. शवविच्छदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. येथिल जय बाबाजी परिवाराचे किरण जाधव यांचे ते दाजी होत.
आजारपणाला कंटाळून इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 21:41 IST
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील यशवंत निकम यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
आजारपणाला कंटाळून इसमाची आत्महत्या
ठळक मुद्देगोदावरीच्या पात्रात अज्ञात व्यक्तीचे प्रेत तरंगतांना शेतकऱ्यांना दिसले