शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ला जमीन देण्यास सिन्नर आघाडीवर मूल्यांकन प्रारंभ : आठवड्यात घेणार जागेचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:44 IST

नाशिक : मुंबई-नागपूर ‘समृद्धी’ महामार्गाला जमीन मोजणीपासूनच विरोध करून अधिकाºयांना पिटाळून लावणाºया सिन्नर तालुक्यातच या महामार्गासाठी जमीन देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने पुढे आल्यामुळे प्रशासनातील अधिकाºयांना हायसे वाटू लागले असून, दोन दिवसांपूर्वी जवळपास २२५ शेतकºयांनी एकत्र येत लेखी निवेदनाद्वारे जमीन देण्याची तयारी दर्शविल्याने या जमिनीचे मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे.

नाशिक : मुंबई-नागपूर ‘समृद्धी’ महामार्गाला जमीन मोजणीपासूनच विरोध करून अधिकाºयांना पिटाळून लावणाºया सिन्नर तालुक्यातच या महामार्गासाठी जमीन देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने पुढे आल्यामुळे प्रशासनातील अधिकाºयांना हायसे वाटू लागले असून, दोन दिवसांपूर्वी जवळपास २२५ शेतकºयांनी एकत्र येत लेखी निवेदनाद्वारे जमीन देण्याची तयारी दर्शविल्याने या जमिनीचे मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे.समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्णातील शेतकºयांचा यापूर्वीचा विरोध हळूहळू मावळत चालल्याचे दिसू लागले असून, गेल्या आठवड्यात पंधरा शेतकºयांकडून थेट खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर अन्य गावांतील शेतकºयांकडूनही त्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सिन्नर तालुक्यातून समृद्धी महामार्गासाठी सर्वाधिक विरोध यापूर्वी करण्यात आला होता. अधिकाºयांना ड्रोनद्वारे जमिनीची मोजणीही न करू देणाºया ग्रामस्थांनी मोजणी करण्यास येणाºया अधिकाºयांना पिटाळून लावले होते तसेच जमिनीवरच सरण रचून प्रशासनावर विरोधाचा दबाव कायम ठेवला होता. परंतु राज्य रस्ते विकास महामंडळाने जमिनींचे दर जाहीर केल्यानंतर शेतकºयांचा विरोध मावळत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी गोंदे, मºहळ बुद्रुक, मºहळ खुर्द, खंबाळे, सायाळे, दातली आदी लगतच्या गावातील शेतकºयांनी एकत्र येत प्रशासनाला लेखी निवेदन देऊन जमीन विक्रीची तयारी दर्शविली आहे. सिन्नरच्या मानाने इगतपुरी तालुक्यातील शेतकरी जमिनी देण्यास अद्याप फारसे पुढे आलेले नाहीत. मंगळवारी इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे आणखी एका शेतकºयाने थेट खरेदी दिली आहे. १३ कोटी अदाशेतकºयांचा मिळणारा प्रतिसाद पाहता ज्यांनी जागा देण्याची तयारी दर्शविली त्यांच्या गटनिहाय व गटातील मालमत्तेचे मूल्यांकन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जमिनी खरेदी केल्यानंतर तत्काळ शेतकºयाच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येत असल्याने गेल्या आठवड्यात १३ कोटी रुपये जमिनीचा मोबदला अदा करण्यात आला आहे. शासनाने समृद्धीसाठी पैसे कमी न पडू देण्याचे यापूर्वीच जाहीर केल्यामुळे येत्या आठवड्यात पुन्हा काही शेतकºयांच्या जमिनींचे व्यवहार पूर्ण केले जातील, अशी माहिती समृद्धीचे समन्वयक विठ्ठल सोनवणे यांनी दिली आहे.