शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे येथे चौघांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:13 IST

---- नाशिक : एकलहरा गेट, निर्मल सोसायटी येथे मित्रास सोडविण्यास आलेल्या युवकाला व इतर तिघांना टोळक्याने मारहाण करुन चाकूने ...

----

नाशिक : एकलहरा गेट, निर्मल सोसायटी येथे मित्रास सोडविण्यास आलेल्या युवकाला व इतर तिघांना टोळक्याने मारहाण करुन चाकूने वार करुन जखमी केले.

जेलरोड पंचक एसबी प्लाझा इमारतीत राहणारे अशोक बबन रांधवन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री कारमधून मित्र हरिष पाटील याला निर्मल सोसायटी येथे सोडविण्यास गेलो होतो. त्यावेळी तेथे दहा ते पंधरा जण रंगपंचमी खेळत होते. रांधवन गाडीतून उतरले असता संजय दिलिप जाधव रा. ट्रॅक्शनजवळ यांच्याकडे येऊन तू येथे कसा आला, नेहमी का येतो, तू ताबडतोब निघून जा, असे म्हणून त्याने शिवीगाळ सुरु केली. जाधवसह सुधीर पगारे, संदीप बागूल, अजय बागूल, सागर सोनवणे, विशाल सोनवणे, राहुल म्हस्के, अक्षय म्हस्के व त्यांचे तीन-चार साथीदार यांनी रांधवन यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. संजय जाधवने चाकूसारख्या हत्याराने हाताच्या दंडावर वार करुन जखमी केले. यावेळी मित्र हरिष पाटील व समाधन बोराळे हे मदतीस आले असता त्यांनाही मारहाण करुन जखमी केले. बोराळेच्या पाठीवर चाकूने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे रांधवन, पाटील, बोराळे पळून गेले. दीड तासानंतर राहुल राजेंद्र साठे, शंकर मल्लेश बाली हे निर्मल सोसायटी येथून जात असताना काही कारण नसताना या संशयितांनी त्यांनाही मारहाण करुन वार करुन जखमी केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.