शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बनावट रेशनकार्डबाबत पुरवठामंत्र्यांकडून विचारणा

By admin | Updated: April 12, 2017 01:15 IST

शासनाकडून दखल : तातडीने अहवाल मागविला; महसूल खात्याच्या भूमिकेविषयी शंका

नाशिक : शहर धान्य वितरण अधिकाऱ्यांनी पंचवटीत टाकलेल्या धाडीत बनावट रेशनकार्डसह शासनाचे विविध प्रकारचे बनावट दाखले सापडल्याची गंभीर दखल राज्याच्या अन्न व नागरी पुरवठामंत्र्यांनी घेतली असून, त्याबाबतचा तातडीने अहवाल मागविण्यात आला आहे. दरम्यान, सदरचा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू असल्याची कबुली आरोपींनी दिल्यामुळे शासनाच्या अधिकाऱ्यांच्या नावे मोठ्या प्रमाणावर बनावट दाखले दिले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पंचवटी महाविद्यालयाजवळील सेतू केंद्राला लागून असलेल्या अग्रवाल असोसिएट््स या दुकानावर सोमवारी धान्य वितरण अधिकारी गणेश राठोड यांनी छापा मारून मोठ्या प्रमाणावर बनावट शासकीय कागदपत्रे ताब्यात घेतली तसेच शंभराहून अधिक कोरे व अधिकाऱ्यांचे सही, शिक्क्यानिशी रेशनकार्ड या ठिकाणी सापडली. सदरची कार्डे हरिश्चंद्र अग्रवाल व प्रमोद नार्वेकर यांनी खासगी प्रिंटिंग प्रेसमधून छापून घेतल्याचेही प्रथम दर्शनी चौकशीत निष्पन्न झाले. इतक्या मोठ्या प्रमाणावर विविध कागदपत्रे सापडल्यामुळे हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची गंभीर दखल अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी तातडीने अहवाल मागविला आहे. संशयित आरोपींकडे अनेक नगरसेवकांचे दाखलेही सापडल्यामुळे हा सारा मामला अतिशय गंभीर वळणावर पोहोचला असून, मुख्य सूत्रधार प्रमोद नार्वेकर हा फरार आहे, त्याच्या अटकेनंतर आणखी माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे. महसूल खाते अनभिज्ञमहसूल खात्याकडून दिले जाणारे राष्ट्रीयत्व, वय व अधिवास, जात, उत्पन्न अशा विविध प्रकारे दाखले तसेच कोरे सातबारा उतारे, फेरफार नोंदीचे अर्ज, नाशिक प्रांत तसेच नाशिक तहसीलदार व भूसंपादन अधिकाऱ्यांचे स्वाक्षरीचे शिक्के, नाशिक तालुक्यात कार्यरत असलेले तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या नावांचे शिक्केही याठिकाणाकडून जप्त करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरापासून सदरचा प्रकार सुरू असल्याची कबुली स्वत: आरोपींनी दिली असली तरी, या गंभीर प्रकरणाविषयी महसूल खाते अगदीच अनभिज्ञ आहे. आरोपींकडे सापडलेले दाखल्यांचा कोठे कोठे वापर झाला, सातबारा उतारे कोणाला दिले आदि बाबींबाबत महसूल खात्याने साधलेली चुप्पी संशयास्पद आहे.